वर्धा : जिल्ह्यात ठिकठिकाणी जोरदार वृष्टी झाल्याने दैना उडाली आहे. सेलू तालुक्यातील धानोली ते बेळगाव हा लोकवर्गणीतून बांधलेला पूल पुरात वाहून गेला. वाहतूक बंद पडली आहे.हिंगणघाट तालुक्यातील आलमदोह ते अलिपूर मार्ग यशोदा नदीच्या प्रवाहामुळे रात्रीपासून ठप्प पडला. समुद्र्पुर तालुक्यातील लाल नाला प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने नदीकाठच्या गावांना सतर्क करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज भेट देत परिस्थितीची पाहणी केली.तर अपर जिल्हाधिकारी विनायक महामुनी यांनी अतिवृष्टी झालेल्या कांहोली, वडनेर, कोसूर्ला, शिरसगाव या गावांना भेट देत मदतीच्या सूचना केल्या.पवनार सेवाग्राम मार्गावरील नागझरी नाल्यावरील पुल वाहून गेल्याने मार्ग बंद करण्यात आला असून त्या ठिकाणी कठडे लावल्या जात आहे. पोथरा, लाल नाला, निम्न वर्धा हे जलाशय तुडुंब भरले असून काहीतून विसर्ग सुरू झाला आहे.