राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तारूढ झाल्यानंतर आता नवे मंत्री कोण याची उत्सुकता सर्वांनाच आहे. या पार्श्वभूमीवर वर्धेचे आमदार डॉ. पंकज भोयर यांच्या नावाची चर्चा वेगळ्याच कारणाने होत आहे. भाजपा नेते व जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तीन वर्षांपूर्वी केलेले जाहीर भाकीत हे या मागचे कारण आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नव्या वास्तूचे भूमिपूजन प्रसंगी मुनगंटीवार म्हणाले होते, की डॉ. भोयर हे या जिल्ह्याचे भावी पालकमंत्री राहतील. त्यामुळे या नव्या मंत्रिमंडळात भोयर यांची वर्णी लागणार काय? हा भोयर समर्थकांना पडलेला प्रश्न आहे. सामाजिक कार्यकर्ते सुरेश पट्टेवार यांनाही जिल्ह्यात मंत्रिपद येण्याची शक्यता वाटते. तर आमदार भोयर याबाबत म्हणाले की, भाजपामध्ये सर्व बाबी सखोल विचार करून ठरविल्या जातात. वरिष्ठ योग्य निर्णय घेतील.
समीर मेघे यांचे नावही चर्चेत –
ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचे पुत्र समीर मेघे यांच्याही नावाची चर्चा संभाव्य मंत्री म्हणून होऊ लागली आहे. त्यामुळे आता नव्या मंत्रिमंडळात नेमकी कुणाची वर्णी लागते हे पाहवे लागणार आहे.