वर्धा : भारतीय नौदलाने नौदल नागरी प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी सुरू केली असून १८ डिसेंबर पासून अर्ज दाखल करता येणार आहे. नौदलाच्या वेबसाईटवरून फक्त ऑनलाईन अर्ज स्वीकारल्या जातील. याद्वारे एकूण ९१० पदांची भरती केल्या जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाला भंगार विक्रीतून ४९.२० कोटींची कमाई

यात चार्जमनच्या ४२, वरिष्ठ ड्राफ्ट्समनच्या २५४, ट्रेड्समन मेटच्या ६१० जागा आहेत. चार्जमन पदासाठी १८ ते २५, ड्राफ्ट्समन पदासाठी १८ ते २७, ट्रेड्समन पदासाठी १८ ते २५ वयोमर्यादा आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर ही आहे. अर्जासाठी सर्वसाधारण गटातील उमेदवारांना २९५ रुपये शुल्क भरावे लागणार.