वर्धा : वर्धा पोलिसांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.राज्याच्या पोलीस महासंचालकांनी उत्कृष्ट तपास कार्याचा पुरस्कार वर्धा पोलिसांना जाहीर केला आहे.गत दहा महिन्यांच्या कामगिरीच्या आधारे ही निवड करण्यात आली आहे. प्रामुख्याने आर्वी कारंजा परिसरात घडलेले प्रकरण व त्याचा तपास उत्कृष्ट ठरले.कोणताही सबळ पुरावा नसताना येथील महिला जळीत कांडातील आरोपींना हुडकून काढण्यात वर्धा पोलिसांना यश आले होते.

या तपासात बाराशेवर महिलांची तपासणी करण्यात आली होती. सतेफळ येथील जंगलातून अखेर आरोपी पकडण्यात आले.हा तपास राज्य गुन्हे अन्वेषण शाखेकडे पाठविण्यात आला. संपूर्ण राज्यातून असे तपास कार्य पुरस्कारासाठी विचारार्थ होते.त्यात वर्धा तपास अव्वल ठरला. पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांनी ऑक्टोंबर २०२२ मध्ये पदभार सांभाळल्यानंतर हे सर्वात आव्हानात्मक प्रकरण होते. त्यासाठी रोख दहा हजार रुपये व प्रमाणपत्र स्वरूपातील पुरस्कारासाठी निवड झाली. हसन यांनी स्थानिक गुन्हे शाखा तसेच तळेगाव पोलीस पथकाचे कौतुक केले आहे.

Two youths attacked with a koyta in Khadki crime news Pune news
पुणे: खडकीत दोघा तरुणांवर कोयत्याने वार
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Mokka crime fugitive arrested from Karnatak Pune news
Pune Crime News: मोक्काच्या गुन्ह्यातील फरारीला कर्नाटकातून अटक
judge detained corruption charges
सातारा जिल्हा सत्र न्यायाधीश लाचप्रकरणी चौकशीसाठी ताब्यात
impeachment motion against justice Shekhar Yadav
अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींविरोधात महाभियोगाची शक्यता; महाभियोग म्हणजे काय? आजवर किती न्यायाधीशांवर झाली कारवाई?
fake police verification certificate, Anti-Terrorism Branch action, fake police verification certificate maker,
सावधान..! बनावट पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट बनवणाऱ्यांवर गुन्हा दाखल; दहशतवाद विरोधी शाखेची कारवाई
Supreme Court News
Supreme Court : कामाच्या ठिकाणी भेदभाव झाल्याचा ट्रान्सवुमन शिक्षिकेचा आरोप, सर्वोच्च न्यायालयाने याचिकेवरील निकाल ठेवला राखून
wardha after DNA test and medical evidence real culprit cought and reveal teacher wast father of child
प्रियकर की शिक्षक ! डीएनए ठरला पुरावा आणि न्यायालयाने ठोठावली शिक्षा
Story img Loader