चंद्रपूर: जिल्ह्यातील वर्धा नदीच्या काठावर असलेल्या शेतात मौर्य ते सातवाहन काळखंडातील अवशेष सापडत आहेत. त्यात टेराकोटाचे मणी, घरगुती वापरातील भांड्यांचे तुकडे, दगडी हत्यार, तांब्याच्या मूर्ती आदींचा समावेश आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातून वैनगंगा, वर्धा, अंधारी, उमा, पैनगंगा नद्या वाहतात. प्राचीन काळात नदी काठावर वस्त्या असायच्या. या वस्त्याचे अवशेष आजही सापडते. गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या वेडगाव शेतशिवारात वर्धा नदीच्या काठावरील वसंता चिताडे यांच्या शेतात प्राचीन वस्तीचे अवशेष सापडले आहेत. ते वाकाटक काळातील असण्याचा अंदाज अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी व्यक्त केला आहे. नदीचा दुसऱ्या काठावर तेलंगणा राज्यातील गावे आहेत. प्राचीन काळात नदी मार्गाने वाहतूक केली जायची. त्यामुळे येथे नाका असावा अशी शक्यता चोपणे यांनी वर्तविली आहे.

Special train from Konkan route , Konkan train ,
कोकण मार्गावरून विशेष रेल्वेगाडी
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Pune railway station, Pune railway station waiting time,
पुणे : रेल्वे प्रवाशांचा स्थानकावरील प्रतिक्षाकाळ कमी होणार, आराखडा अंतिम टप्प्यात
Thane district water, MIDC, MIDC water scheme ,
ठाणे जिल्ह्याचे पाणी महागणार ? एमआयडीसीची पाणी योजना तोट्यात, दर वाढवण्याच्या हालचाली
average speed of freight trains over previous 11 years barely 25 kilometers per hour
अवघा २५ किलोमीटर सरासरी वेग… मालगाड्यांचा वेग कमी झाल्याने मालवाहतुकीवर परिणाम होत आहे का?
pune wagholi accidents loksatta news
पुण्यात ‘या’ रस्त्यावरून क्षमतेपेक्षा जास्त वाहनांचा प्रवास, प्रवाशांसाठी का ठरतोय जीवघेणा?
lonar lake flamingos marathi news
Video : ‘फ्लेमिंगो’ला आवडले लोणार सरोवर
illegal construction in Mahabaleshwar are demolish
महाबळेश्वर अवैद्य बांधकामावर हातोडा

हेही वाचा – अकोला : आठ दिवस रेल्वे फाटक बंद, नागरिकांना मनस्ताप

हेही वाचा – मराठी भाषा विभागातील अधिकाऱ्यांना मराठी येते काय? शासनाकडून उत्तर देण्यात टाळाटाळ

उत्खनन करण्याची मागणी

गोंडपिपरी तालुक्यातील गावागावात ऐतिहासिक वस्तू सापडतात. वेडगाव येथे सापडत असलेल्या वस्तू गोंडपिपरी तालुक्यातील इतिहासात भर टाकणाऱ्या आहेत. या रिठाचे उत्खनन पुरातत्व विभागाने करावे, अशी मागणी ऐतिहासिक वारसा संवर्धन समितीचे अध्यक्ष अरुण झगडकर यांनी केली.

Story img Loader