वर्धा : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या राष्ट्रीय पात्रता चाचणीसाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीने नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. २०२३ डिसेंबरमध्ये ही परीक्षा होत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ ऑक्टोबर आहे. विद्यापीठ व महाविद्यालयात सहायक प्राध्यापक पदासाठी नेट उत्तीर्ण होणे आवश्यक असते. सादर अर्जात दुरुस्ती करण्यासाठी तीस व एकतीस ऑक्टोबर असे दोन दिवस देण्यात आले आहे. परीक्षा केंद्र असलेल्या शहरांची नावे नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घोषित होतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी

हेही वाचा : महिला उपसरपंचाचा पतीसह अवयवदान व देहदानाचा संकल्प

अनारक्षित प्रवर्गातील उमेदवारांनी युजीसीद्वारे मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष परीक्षेत ५५ टक्के गुण प्राप्त केलेले असावेत. पीएचडी पदवी घेतलेल्या आणि पदव्युत्तर परीक्षा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना एकूण गुणात पाच टक्के सूट मिळते. पदव्यूत्तर परीक्षेचे अंतिम वर्ष पूर्ण केले व निकालाची प्रतीक्षा असलेले पण अर्ज करू शकतात. यूजीसी नेटसाठी संगणक आधारित दोन चाचण्या असतात. उमेदवार ugcnet.nta.ac.in या अधिकृत वेबसाईटवर नोंदणी करू शकतात.