लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर: शासनाने आशा वर्कर आणि गटप्रवर्तकांच्या मागण्या मान्य करूनही अध्यादेश निघालेला नाही. त्यामुळे १२ जानेवारीपासून आशा वर्कर व गटप्रवर्तक संपावर आहेत. वारंवार निवेदन व आंदोलन करूनही शासन मागणी पूर्ण करत नसल्याने शेवटी राममंदिर उद्घाटनाच्या दिवशी काळे वस्त्र घालून सरकारविरोधात आंदोलन करणार असल्याची घोषणा आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियनचे (सी.आय टी.यू.) अध्यक्ष राजेंद्र साठे यांनी केली.

मंदिर निर्मितीला आमचा विरोध नाही. लाखो रुपये मंदिर बांधकाम करणाऱ्या केंद्र शासनाच्या कामगार व शेतकरी विरोधी धोरणाचा हा निषेध आहे. राज्यातीलही शासन कामगार विरोधी असल्याने हे आंदोलन केले जाणार असल्याचे साठे यांनी सांगितले.

आणखी वाचा-अपघात पीडित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयापुढे ‘राम नाम जप’ करणार! जाणून घ्या कारण…

राज्यातील कर्मचाऱ्यांना किमान वेतन द्या, तसेच आशा वर्कर व गटप्रवर्तक यांना राज्य शासनाने घोषित केलेल्या निर्णयाचा अध्यादेश काढा, या मागणीकरता हे आंदोलन अशे. दरम्यान या आंदोलनानंतरही शासन ढिम्म राहिल्यास पुढे राज्यभरात विविध मंत्री व आमदारांना त्यांच्या घरी जाऊन घेराव घालणार असल्याचेही साठे यांनी नागपुरातील संविधान चौकात सांगितले. देशात जातीय सलोखा अबाधित राहावा, महिलांवरील व दलीत – आदिवासी वरील अत्याचार बंद व्हावे, महागाईला आळा घालावा, नवीन कामगार कायदे रद्द करावे, ईव्हीएम चा आधार घेऊन निवडणुकीत घोळ करणाऱ्या शासनकर्त्यांचा निषेध करत ईव्हीएम वरील होणारे पुढील मतदान थांबवून बॅलेट पेपर वर मतदान घ्यावे असे त्यांनी सांगितले.

आणखी वाचा-नागपूर : पंतगांच्या नादात दोघे भाऊ पडले कालव्यात…

अशा आहेत मागण्या

  • आशा व सुपरवायजर यांना ५ हजार रुपये दिवाळी बोनस द्या
  • गटप्रवर्तक यांचा आशा सुपरवायजर नामोल्लेख करा
  • आशा – सुपरवायजर यांना ऑनलाइन डाटा एन्ट्री सक्ती करू नये
  • आशा व सुपरवायझर यांना किमान वेतन द्या
  • आशा सुपरवायझर यांना कंत्राटी कर्मचारी प्रमाणे समायोजित करा
  • सी एच ओ नसलेल्या सब सेंटर मधील आशा वर्कर ला आरोग्य वर्धिनीचा निधी वैद्यकीय अधिकारीच्या स्वाक्षरीने द्यावा
  • आशा सुपरवायझरला १,५०० रुपये महिना आरोग्य वर्धीनी निधी द्यावा
  • शासकीय सुट्टीचे दिवशी लाभार्थीची माहिती मागवू नये
  • लाभार्थीची माहिती सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंतच मागवावी, इतर वेळेस मॅसेज किंवा फोन करू नये.
  • डेंग्यू, क्षयरोग, कुष्ठरोग कामाचा २०० रूपये रोज देण्यात यावा