Warora Assembly Election Result 2024 : घराणेशाही जिंकली; घराणेशाही हरली? वरोरा मतदारसंघात सत्तर वर्षांत प्रथमच कमळ

विधानसभा निवडणुकीच्या ७० वर्षांच्या इतिहासात वरोरा मतदारसंघात प्रथमच भाजपाचे कमळ फुलले आहे.

Warora constituency, BJP candidate Warora , Warora ,
घराणेशाही जिंकली; घराणेशाही हरली? वरोरा मतदारसंघात सत्तर वर्षांत प्रथमच कमळ (छायाचित्र – लोकसत्ता टीम/ग्राफिक्स)

चंद्रपूर : विधानसभा निवडणुकीच्या ७० वर्षांच्या इतिहासात वरोरा मतदारसंघात प्रथमच भाजपाचे कमळ फुलले आहे. येथे भाजपाचे करण देवतळे १५ हजार मतांपेक्षा अधिक मतांनी विजयीची घोडदौड सुरू आहे.

देवतळे यांना ६० हजार ८९८ मते मिळाली तर महाआघाडीचे बंडखोर मुकेश जीवतोडे यांना ४६ हजार १५८ मते मिळाली. लाडकी बहीण खासदार प्रतिभा धानोरकर यांचे लाडके भाऊ काँग्रेसचे प्रवीण काकडे यांना अवघी २३ हजार १७५ मते मिळाली आहे. येथे एका अर्थी घराणेशाही हरली व घराणेशाही जिंकली असे म्हणता येईल.

हेही वाचा – VIDEO : ‘मै समंदर हू लौट कर वापस आऊंगा..,’ विजयानंतर फडणवीसांचा भावनिक व्हिडिओ प्रसारित

वरोरा या कुणबी बहुल मतदारसंघात आजवर भाजपाने कधीच विजय मिळविला नाही. या मतदारसंघावर भाजपा उमेदवार करण देवतळे यांचे आजोबा दादासाहेब देवतळे यांचे वर्चस्व होते. त्यांनी काँग्रेस पक्षाकडून या मतदारसंघात सलग निवडणुका जिंकल्या व राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्रीही होते. त्यांच्या पश्चात शेतकरी संघटनेचे ॲड. मोरेश्वर टेमुर्डे यांनी सलग दोन निवडणुका जिंकल्या.

ॲड. टेमुर्डे यांचा पराभव करण देवतळे यांचे वडील तथा राज्याचे माजी मंत्री दिवंगत संजय देवतळे यांनी केला. संजय देवतळे यांनी काँग्रेस पक्षात असताना सलग चार विधानसभा निवडणुका जिंकल्या. राज्याच्या मंत्रिमंडळात पर्यावरण व सांस्कृतिक मंत्री म्हणून कार्यरत होते. लोकसभा निवडणुकीत दारूण पराभाव झाल्यानंतर काँग्रेस पक्षाने वरोरा मतदारसंघातून त्यांच्याऐवजी डॉ. आसावरी देवतळे यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे दुखावलेले संजय देवतळे यांनी भाजपात प्रवेश करून निवडणूक लढविली. २०१४ ची निवडणूक शिवसेनेकडून दिवंगत बाळू धानोरकर यांनी जिंकली. कालांतरने बाळू धानोरकर यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करून लोकसभेची निवडणूक जिंकली. विधानसभेत पत्नी प्रतिभा धानोरकर यांना स्वयंपाक खोलीतून थेट विधानसभेची उमेदवारी दिली व निवडून आणले. मात्र प्रतिभा धानोरकर यांनी बाळू धानोरकर यांच्या निधनानंतर लोकसभा निवडणूक २ लाख ६० हजार मतांनी जिंकली. त्यामुळे आत्मविश्वास बळावलेल्या धानोरकर यांनी घरातच तिकीट द्यायची असा आग्रह पक्षश्रेष्ठींकडे धरला.

हेही वाचा – Gondia District Vidhan Sabha Result : गोंदियात इतिहास; पहिल्यांदाच फुलले कमळ, जिल्ह्यात महायुतीचा भगवा झेंडा

लाडका भाऊ प्रविण काकडे याची क्षमता नसताना उमेदवारी दिली. त्याचा व्हायचा तो परिणाम झाला. येथे देवतळे १५ हजारांपेक्षा अधिक मतांनी विजयी होत आहे. तर बंडखोर मुकेश जिवतोडे दुसऱ्या स्थानी आहे. प्रविण काकडे तिसऱ्या स्थानी फेकल्या गेले. येथे एक प्रकारे देवतळेंच्या रुपाने घराणेशाही जिंकली व काकडे यांच्या रुपाने घराणेशाही हरली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Warora assembly election result 2024 bjp candidate for the first time in seventy years in warora constituency rsj 74 ssb

First published on: 23-11-2024 at 18:02 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या