वाशिम : २ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून “स्वच्छता ही सेवा २०२३” हा उपक्रम आज जिल्ह्यात राबविण्यात आला. बस स्थानक परिसरातील घाण कचरा जिल्हाधिकारी बुवनेश्र्वरी यांनी स्वतः उचलून स्वच्छतेचा संदेश दिला. या उपक्रमांतर्गत शहरी आणि ग्रामीण भागात प्रत्येक वॉर्ड व ग्रामपंचायतीमध्ये एक तास श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या मोहिमेचा एक भाग म्हणून तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणुन हा उपक्रम जिल्ह्यातील ६७५ गावात राबविण्यात आला. जिल्हाधिकारी बुवनेश्र्वरी एस. यांनी स्वच्छतेच्या कार्यात सहभाग घेतला. जिल्हाधिकारी यांनी बस स्टँड परिसरातील झाडे झुडपे स्वच्छ करीत तेथील कचरा टोपल्यात एकत्र करून उचलून ट्रॉलीमध्ये टाकला. या परिसरातून जवळपास पाच ट्रॉली कचरा संकलीत करण्यात आला.

हेही वाचा : गोंदिया : ९१५ गावांची नजर पैसेवारी ५० पैशाच्या वर, अतोनात नुकसान तरीही…

जिल्हाधिकारी यांनी स्वतः तासभर काम केले. या वेळी त्यांच्या समवेत सहायक जिल्हाधिकारी अपूर्वा बासुर, नगर पालिकेचे मुख्याधिकारी निलेश गायकवाड, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे शिक्षक, विद्यार्थी तसेच समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी व कर्मचारी यांनी देखील येथील बस स्थानक परिसर स्वच्छ केला. यामुळे सर्वत्र स्वच्छता दिसून आली. तर अनेकांनी जिल्हाधिकारी यांच्या कार्याचे कौतुक केले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Washim district collector buveneswari s participated in cleanliness drive pbk 85 css
Show comments