वाशिम : शुक्रवारी रात्री उशिरा जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पाऊस झाला. आज पुन्हा एकदा जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कधी कडक उन तर कधी अवकाळी पाऊस अशी स्थिती आहे. लग्नसराई असून त्यातच पावसाचा व्यत्यय येत असल्यामुळे अनेकांची गैरसोय होत आहे. शुक्रवारी रात्री उशिरा काही भागात अवकाळी पाऊस झाला तर बहुतांश ठिकाणी विजांचा कडकडाट सुरु होता. यामुळे अनेक गावांतील वीजपुरवठा खंडीत करण्यात आला होता. सर्वत्र कडक उन तापत असून वाढत्या उकड्याने अंगाची लाही लाही होत असून वारंवार वीजपुरवठा खंडीत होत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. आज पुन्हा एकदा जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तविला आहे.

हेही वाचा – यवतमाळात वाहनांची तोडफोड करणाऱ्या टोळीची दहशत; १५ दिवसांपासून…

हेही वाचा – एसटी महामंडळात गर्दीचा हंगाम पाहून कामात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई? झाले असे की…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लग्न सोहळ्यावर संकट

सध्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर लग्नाची धामधूम सुरु आहे. मात्र पावसाचा अंदाज देखील व्यक्त केला जात आहे. यामुळे अनेकांचे नियोजन विस्कळीत होत असल्याचे दिसून येत आहे.