वाशीम : जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही कुठे तुरळक तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. यामुळे काही वेळ अनेक गावातील वीज पुरवठा खंडित झाला होता.
जिल्ह्यातील अनेक भागात गेल्या काही दिवसापासून अवकाळी पावसाने जोर धरला आहे. आज, गुरुवारी तिसऱ्या दिवशीही राजाकिन्ही, वाशीम व इतर ठिकाणी पाऊस झाला तर मंगरुळपीर तालुक्यातील अनेक गावात जोरदार वादळीवाऱ्यासह गारपीट झाली. वादळी वाऱ्यामुळे शेतकरी व किरकोळ व्यापाऱ्यांची एकच तारांबळ उडाली.