वाशिम : जिल्ह्यातील शेलूबाजार येथील वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने संतापलेल्या नागरिकांनी नागपूर -संभाजीनगर महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केले.
गत काही दिवसापासून शेलूबाजारच नव्हे तर अनेक गावातील वीज पुरवठा काही ना काही कारणाने वारंवार खंडित होत असल्यामुळे ऐन उकड्याच्या दिवसात नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. महावितरण विभागाकडे वीज पुरवठा सुरळीत करण्याची अनेक वेळा मागणी केल्यानंतरही वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याने अखेर संतापलेल्या नागरिकांनी नागपूर -संभाजीनगर या राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.
हेही वाचा – नागपुरातील आरटीई घोटाळ्याचा आरोपी शाहिद शरीफ सापडेना, हाती लागल्यास अनेक अधिकाऱ्यांसह…
अर्ध्या तासाहूनही अधिक वेळ चाललेल्या या आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. अखेर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागली तर वाहन चालकांनाही मनस्ताप सहन करावा लागला.
© The Indian Express (P) Ltd