लोकसत्ता टीम

वाशीम: रेल्वे मंत्रालयाच्या अमृत भारत स्थानक योजने अंतर्गत वाशीम रेल्वे स्थानकाच्या सौदर्यीकरणासोबतच पायाभुत सुविधांसाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. उद्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

grand alliance government accelerate the shaktipeeth highway work after election victory
निवडणुकीत प्रचंड बहुमत… आता महायुती सरकारकडून शक्तिपीठ महामार्गाला गती?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
bmc fixed deposits reduce by 10 thousand crore in current financial year
मुदतठेवींमध्ये १० हजार कोटींची घट; पालिकेचा राखीव निधी ९१ हजार कोटींवरून ८१ हजार कोटींवर
Mahakumbh mela 2025
Maha Kumbh Mela 2025: महाकुंभमुळे मिळणार २००० कोटींची आर्थिक चालना; अर्थव्यवस्था काय सांगते?
Tuljapur Temple Vikas Arakhada loksatta news
२१०० कोटींचा तुळजाभवानी तीर्थक्षेत्र विकास आराखडा मान्यतेसाठी मुख्यमंत्र्यांकडे सादर, आमदार पाटील यांची माहिती
underground Ulhasnagars old electricity system is fulfilled with 16 84 crore funding approved
उल्हासनगरातील विद्युत वितरण यंत्रणा भूमीगत होणार; केंद्रीय योजनेतून १६ कोटींचा निधी, मात्र खोदकामामुळे त्रास वाढण्याची भीती
devendra fadanvis
३५०० एकर जमिनीचे १०० दिवसांत वितरण; ‘एमआयडीसी’च्या भूखंडांबाबत मुख्यमंत्र्यांचे आदेश
Aaple Sarkar, devendra fadnavis, mumbai,
‘आपले सरकार’द्वारे सेवांमध्ये वाढ करा : मुख्यमंत्री

जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या वाशीम रेल्वे स्थानकावरुन अनेक लांबपल्यांच्या रेल्वेगाड्या उलपब्ध झाल्याने याठिकाणी प्रवाशांची कमालीची वर्दळ वाढली आहे. परंतु प्रवाशांसाठी पाहिजे तशा सोईसुविधा उपलब्ध नसल्याने प्रवाश्यांना विविध अडचणी येत होत्या. परंतु रेल्वे मंत्रालयाने रेल्वे स्थानकांच्या विकासासाठी ‘अमृत भारत स्थानक योजना’ कार्यान्वित करण्याचा निर्णय घेत योजनेसाठी कोट्यवधींच्या निधीची तरतूद केली आहे. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

आणखी वाचा-रेल्वेप्रवाशांसाठी आनंदवार्ता! नागपूर-उमरेड नवीन मार्गावर धावणार रेल्वेगाडी

येथील स्थानकाच्या इमारतीच्या दर्शनी भागाचे नुतनीकरण, प्रवाशांसाठी प्रशस्त प्रतीक्षागृह, स्वयंचलित जिने, बैठक व्यवस्था, स्वच्छतागृह, पिण्यासाठी स्वच्छ पाणी, तिकिट खिडकीचे विस्तारिकरण, रेल्वे स्थानकाचे विद्युतीकरण व सुशोभीकरण करण्यासोबतच प्रवाशांकरीता आवश्यक त्या सर्व सोईसुविधा उपलब्ध करण्यावर भर दिल्या जाणार आहे़. यामुळे स्थानकाचा चेहरा मोहरा बदलून अत्याधुनिक होणार आहे.

Story img Loader