वाशिम : मेहकरहून मानोऱ्याकडे लग्नसमारंभासाठी जात असलेल्यांच्या कारला समोरून येणाऱ्या कारने जोरदार धडक दिल्याची घटना मंगरुळपीर तालुक्यातील कोळंबी गावाजवळ घडली. या भीषण दुर्घटनेत एका कारमधील दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी आहे. दुसऱ्या कारमधील दोनजण किरकोळ जखमी झाले आहेत. अपघात इतका भीषण होता की, एक कार थेट रस्त्याच्या कडेला जाऊन दरीत कोसळली आणि दुसऱ्या कारचा चुराडा झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – नागपूर : कुणाल बॅटरीचा भरचौकात खून

हेही वाचा – नागपूर : आयपीएस अधिकाऱ्याच्या पत्नीची छेड काढणे पडले महागात

बुलढाणा जिल्ह्यातील डोणगाव मेहकर येथून ही मंडळी मानोऱ्याकडे लग्नसमारंभासाठी जात होती, अशी प्राथमिक माहिती आहे. जखमींमधील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सूत्रांनी सांगितले. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.