राम भाकरे
फक्त ओला कचरा उचलणार; महापालिकेचा निर्णय
मोठी निवासी संकुले, अपार्टमेन्टमध्ये गोळा होणारा कचरा यापुढे महापालिका उचलणार नाही, तर तेथील नागरिकांनाच संयुक्तपणे त्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा उभी करावी लागेल. फक्त ओला कचराच महापालिकेचे कर्मचारी उचलतील.
शहरातील वाढत्या कचऱ्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महापालिकेने हा पर्याय स्वीकारला असून काही ठिकाणी त्याची अंमलबजावणीही सुरूही झाली आहे. ही योजना व्यापक प्रमाणात लागू करण्यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.
प्रत्येक मोठय़ा शहरात उद्भवणारी कचऱ्याची समस्या नागपुरातही गंभीर होत चालली आहे. भांडेवाडीतील डंम्पिग यार्ड अपुरे पडत आहे. नवीन ठिकाणी कचरा संग्रहित करायला नागरिकांचा विरोध आहे. दुसरीकडे दैनंदिन कचरा निर्मितीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे तो कुठे साठवून ठेवायचा हा प्रश्नच आहे. शहरातील अपार्टमेन्ट किंवा सोसायटीमध्ये निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर तेथेच प्रक्रिया केली तर काही अंशी ही समस्या दूर होऊ शकते. त्यामुळे महापालिकेने अपार्टमेन्ट आणि सोसायटीतील नागरिकांना वरील सक्ती केली आहे. त्यानुसार यापुढे महापालिकेचे कर्मचारी तेथील कचरा उचलणार नाही किंवा त्या परिसरात कचरा संकलित करणाऱ्या गाडय़ा जाणार नाहीत. जयताळा, सुरेंद्रनगर, गोपालनगर, बेसा या भागातील अपार्टमेन्टमध्ये अशी व्यवस्था करण्यात आली आहे. जानेवारीमध्ये २०१९ जानेवारी मध्ये केंद्रीय समितीचे पथक सर्वेक्षणासाठी नागपुरात येणार आहे. त्यापूर्वी या योजनेला गती देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.
सध्याची व्यवस्था
शहरातील घरे, निवासी संकुले, सोसायटी आणि इतरही भागातील घराघरांमधून निर्माण होणारा ओला व सुका कचरा महापालिका उचलते. तसेच शहरातील मोकळ्या भूखंडावर साचलेला किंवा ठिकठिकाणी ठेवलेला कचरा उचलणारी यंत्रणाही महापालिकेचीच आहे. हा सर्व कचरा भांडेवाडीतील डंम्पिग यार्डमध्ये साठवला जातो व त्यापैकी काही कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते.
झोननिहाय अपार्टमेन्ट
लक्ष्मीनगर – ११२
धरमपेठ झोन – १२४
धंतोली – ११०
नेहरूनगर – ८२
गांधीबाग – ७८
सतरंजीपुरा – ६५
लकडगंज – १०७
आशीनगर – ६५
मंगळवारी – ७२
अंमलबजावणीतील अडचणी
सोसायटी किंवा अपार्टमेन्टमध्ये कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात जागेची अडचण येण्याची शक्यता आहे. अनेक अपार्टमेन्टमध्ये यासाठी जागाच सोडण्यात आली नाही. काही ठिकाणी मोकळी जागा वाहने उभी करण्यासाठी वापरली जाते. सुरेंद्र नगरातील शततारका अपार्टमेन्टमध्ये १२५ च्या जवळपास सदनिका आहे, तर उमरेड मार्गावरील निर्मल अपार्टमेन्टमध्ये १३५ सदनिका आहेत. या ठिकाणी जागेची अडचण येऊ शकते.
* नागपुरात दररोज निर्माण होणारा कचरा – १२०० टन
* अपार्टमेन्टमधून जमा होणारा कचरा – ५५० टन
* कचरा उचलणारी कंपनी – कनक
आमच्या निवासी संकुलात १३५ सदनिका आहेत. सध्या येथील कचरा खासगी सफाई कर्मचारी नेतो. कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी जागेची आवश्यकता आहे, ती आमच्याकडे नाही.’’
– शंतनू देशपांडे, नागरिक, निर्मलअपार्टमेन्ट
अपार्टमेन्ट आणि सोसायटीत जमा होणाऱ्या कचऱ्याचे व्यवस्थापन तेथेच करावे लागेल. सोसायटीनेच जागेची निवड करायची आहे. भांडेवाडीमध्ये कचरा जमा करण्यासाठी जागा अपुरी पडत असल्याने हा निर्णय घेतला आहे. केवळ ओला कचरा सफाई कर्मचारी घेऊन जातील.
– दिलीप कांबळे, आरोग्य अधिकारी, महापालिका