|| अविष्कार देशमुख

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सीएसआर निधीतून भागवणार नागपूरकरांची तहान

शहरातील अनेक भागात बाराही महिने पाण्याची टंचाई असते. उन्हाळ्यात तर अनेकांना पाण्यासाठी अक्षरश: वणवण भटकावे लागते. इतकी उठाठेव केल्यावरही मिळणारे पाणी शुद्ध असेलच याची खात्री नसते. परिणामी, अनेक आजार बळावतात. हे टाळण्यासाठी आता शहरातही पाण्याच्या एटीएमची संकल्पना वास्तवात येत असून नागपुरात १५ नवे एटीएम बसवण्यात आले आहेत. अमृत जल योजनेच्या माध्यमातून व सामाजिक उत्तरदायित्व निधीतून नागपूरकरांना केवळ २५ पैशांत एक लिटर शुद्ध पाणी (मिनरल वॉटर) मिळणार आहे.

जिल्ह्य़ात अनेक खेडेगावांत वॉटर एटीएम सुरू करण्यात आल्याने आरोग्याच्या ७० टक्के तक्रारी कमी झाल्याचे चित्र आहे. वॉटर एटीएमचे चांगले परिणाम बघता आता ही संकल्पना शहरातही राबवली जात आहे. शहरालगतच्या अनेक वस्त्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचे स्रोत एकतर बोअर नाही तर विहीर असून या पाण्यातील क्षारामुळे आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होत आहेत.  या समस्यांवर मात करण्यासाठी वॉटर एटीएम  प्रभावी पर्याय म्हणून समोर आला आहे. वॉटर एटीएमसाठी लागणारा खर्च सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या (सीएसआर) अंतर्गत केला जात असून सर्व वॉटर एटीएमची देखरेख महिला बचट गटाच्या हाती सोपवण्यात आली आहे. जेणेकरून त्यांनाही रोजगार उपलब्ध होईल. नागरिकांना २० लिटर थंड पाण्याची कॅन देखील मिळवता येईल. यासाठी वॉटर एटीएम कार्ड तयार करण्यात आले असून कार्ड स्वाईप करून हवे तेवढे पाणी मिळवता येते. एक वॉटर एटीएम उभारण्यासाठी अंदाजे आठ ते दहा लाख रुपये लागतात. शहरातील वॉटर एटीएम महाजनको,भारत हेवी इलेक्ट्रिक्स अशा मोठय़ा कंपन्यांच्या सीएसआर फंडातून लावण्यात आले आहेत. हे वॉटर एटीएम पाणी पिण्यास लायक नसलेल्या बोअरवेल्सला अथवा पाण्याच्या टाकीला जोडण्यात येतील.पाण्याच्या शुद्धिकरणासाठी आवश्यक अल्ट्रा फिल्टरेशन,ओझोनिझेशन आदी प्रक्रिया पूर्ण केल्या जातील. स्टोरेज युनिटमध्ये एकदा पाणी पडल्यास नागरिक कार्ड स्वाईप करून सहज शुद्ध पाणी (मिनरल वॉटर) मिळवू शकतील.

शहरात येथे असेल वॉटर एटीएम

असोलेशन हॉस्पिटल, इंदिरानगर, राहटेनगर टोळी, जयतळा बाजार, एकात्मतानगर, जोगीनगर, नरेंद्रनगर, भगवाननगर, चुनाभट्टी, सोमलवाडा, पांढराबोडी, खामला जुनी वस्ती, मनीषनगर, सोनेगाव वस्ती, त्रिमूर्तीनगर, बेसा.

ज्या भागात पाण्याची स्थिती गंभीर आहे किंवा जेथे पाण्याची गुणवत्ता चांगली नाही अशा ठिकाणी सर्वेक्षण करून वॉटर एटीएम सुरू करण्यास आम्ही प्राधान्य देतो. आतापर्यंत नागपूर जिल्यात शंभर ठिकाणी  शहराच्या सीमा भागातील काही वस्त्यांमध्ये वॉटर एटीएम सुरू आहेत. सध्या शहरात पंधरा नवे एटीएम बसवण्यात आले असून डिसेंबरअखेर तेही कार्यान्वित होतील.   – अभिजित गान, संचालक, राईट वॉटर सोल्युशन