लोकसत्ता टीम

चंद्रपूर : जलमापक यंत्र ( मीटर ) काढून पाण्याचा वापर करणाऱ्या २४५ नळ धारकांवर नळ जोडणी बंद करण्याची कारवाई केली आहे. तर १०७ जलमापक यंत्र जप्त केले. तसेच मीटर काढून पाण्याचा वापर करणाऱ्या २ हजार ४०७ नळधारकांची नोंद घेण्यात आली असून मीटर जोडणी न केल्यास कारवाईचा इशारा महापालिकेने दिला आहे.

pune sahakar nagar water supply cut
पुणे : शहरातील ‘ या ‘ भागात गुरुवारी पाणी नाही !
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Water from 19 private purification projects on Sinhagad Road is contaminated
‘त्या’ १९ खासगी शुद्धीकरण प्रकल्पातील पाणी देखील दुषितच!
Mumbai corporation 540 crore cleaning drains monsoon
नाल्यांच्या सफाईसाठी ५४० कोटींचा खर्च अपेक्षित
Mumbai water supply cut
भांडूप, कुर्ला, अंधेरी, जोगेश्वरी ते वांद्रे परिसरातील पाणीपुरवठा बुधवारी बंद, ३० तासांसाठी पाणीपुरवठा बंद
Thane Water Cut Supply Disrupted Due to Power Outage at Temghar Pumping Station
ठाणेकरांपुढे पाणी संकट; टेमघर पाणी पुरवठा केंद्रातील वीज यंत्रणेत बिघाड 
pune water bill marathi news
पुणे : पुरवठ्या आधीच समाविष्ट गावांच्या पाणीपट्टीत वाढ ?
Ghodbunder water shortage in old Thane
घोडबंदरपाठोपाठ जुन्या ठाण्यातही पाणी टंचाई; पाणी समस्या सोडवाच पण, तोपर्यंत टँकरने मोफत पाणी द्या, बैठकीत मागणी

आयुक्त विपीन पालीवाल यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील नळ जोडणी योजनेचा आढावा घेण्यात आला. शहरातील सर्व नळ जोडणीवर जलमापक (मीटर) लावले आहेत. जानेवारी महिन्यापासुन याचा प्रत्यक्ष वापर सुरु आहे. मात्र घरपोच पाणी मिळत असूनही अनेक नागरिकांद्वारे पाण्याचे देयक भरण्यात कुचराई करण्यात येत असल्याने मोठया प्रमाणात थकबाकी निर्माण होत आहे. मीटर लावण्यात आलेल्या घरांपैकी केवळ १४ टक्के इतक्याच नळजोडणी धारकांनी देयकाचा भरणा केलेला आहेत. यामुळे प्रामाणिकपणे करभरणा करणाऱ्या नागरिकांचे नुकसान होत असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागातर्फे देण्यात आली.

आणखी वाचा-प्रायव्हेट कोचिंग क्लासेसवर लगाम!; शाळांमध्ये विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी नसल्यास…

काही नळ ग्राहक हे पाणी वापराचा खर्च टाळण्याच्या दृष्टीने पाईपलाइनवर बसविण्यात आलेले जलमापक यंत्र काढुन पाणी भरत असतात. त्यामुळे अनेकदा नागरिकांचे देयक हे शून्य रुपये येते. सदरची बाब नियमबाहा असल्याने असे प्रकार थांबविण्याच्या दृष्टीने येत्या १५ दिवसांत पाणी पुरवठा कार्यालयात प्रत्यक्ष अथवा भ्रमणध्वनी व्दारे संपर्क करून नळ जोडणी करून घेण्याच्या सूचनाही व्हॉल्वमनमार्फत सदर नळ धारकांना देण्यात आल्या होत्या. परंतु अजुनही काही नळ धारकांनी नळ जोडणी न केल्याने अशा ग्राहकांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात येत आहे.

आणखी वाचा-वनमंत्र्यांच्या पहिला विदर्भ दौरा, माजी वनमंत्र्यांच्या कामाचे कौतुक

याप्रसंगी आयुक्त यांनी सूचनांचे पालन न करणाऱ्या नळ धारकांची नळ जोडणी कपात करण्याच्या तसेच मोठ्या अपार्टमेंटमधील रहिवाशांचे वैयक्तीक कनेक्शन बंद करून सोसायटीच्या नावे एकच कनेक्शन देण्याची सूचना केली. नळ कपातीसाठी पालिकेमार्फत ६ पथक तयार केली आहे. ज्या नळ ग्राहकांची नळ कपात करण्यात आलेली आहे अशा ग्राहकांनी पुनश्चः नळ जोडणीकरिता आवश्यक शुल्क आकारणीचा भरणा करावा, यासाठी मनपा पाणी पुरवठा विभाग अथवा पाण्याची टाकी कार्यालय येथे संपर्क करण्याचे मनपाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.

Story img Loader