बुलढाणा : तीन दिवसांच्या तांडवानंतर पावसाचा जोर आता कमी झाला आहे. मात्र केवळ तीन दिवसांतच अतिवृष्टीमुळे जिल्हयात तब्बल १५ हजारांपेक्षा जास्त हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे.
हेही वाचा <<< मोदींवर टीका करताच नोकरी गमावली!; भंडाऱ्यातील पोलीस उपनिरीक्षकाची हकालपट्टी
हेही वाचा <<< अकोला : नदीवरील पूल ओलांडतांना आजोबा व नातू नदीच्या प्रवाहात वाहून गेले
१० ते १२ सप्टेंबर दरम्यान पावसाने १३ पैकी बहुतेक तालुक्यातील शेतीला जबर तडाखा दिला. यातही ५ तालुक्यातील नुकसान शेतकऱ्यांना हादरविणारे ठरले. या दरम्यान ८४ गावांतील १५ हजार ७०१ हेक्टरवरील ऐन बहरात असलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले. खामगाव तालुक्यातील २५ गावांतील ६२८ हेक्टरवरील सोयाबीन, कापूस, तूर या पिकांची हानी झाली. प्रामुख्याने नदीकाठच्या शेतीचे नुकसान झाले. जळगाव तालुक्यातील ३७ गावातील ५५६३ हेक्टरवरील सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले. संग्रामपूर मधील १० गावांतील ६५० हेक्टर वरील सोयाबिनचे नुकसान झाले. देऊळगाव राजा तालुक्यातील माती नाला बांध फुटल्याने पिंपळनेर मधील ५.२० हेक्टरवरील सोयाबीन जमीनदोस्त झाले आहे.