लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर: बल्लारशाह-काझीपेठ दरम्यानचे रेल्वे पूल क्रमांक ३ वर धोक्याच्या पातळीवर पाणी वाहत असल्याने दक्षिणकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या या रेल्वे मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. या मार्गावरून धावणाऱ्या गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. तर एक गाडी रद्द करण्यात आली आहे.

यशवंतपूर-निझामुद्दीन कर्नाटक संपर्क क्रांती एक्सप्रेस आणि यशवंतपूर-गोरखपूर सुपरफास्ट एक्सप्रेस निजामाबाद- नांदेड- अकोला- खंडवा- इटारसी मार्गे वळण्यात आली आहे. सिंकदराबाद-हजरत निझामुद्दीन रांन्तो एक्सप्रेस सिकंदराबाद-वाडी-दौंड-मनमाड-इटारसी मार्गे वळवण्यात आली आहे. रेनिगुंटा-निजामाबाद एक्सप्रेसला निजामाबाद – मुदखेड- पिंपळकुट्टी मार्गे वळवण्यात आली आहे. कोरबा-कोच्चुवेली सुपरफास्ट एक्सप्रेस आणि नवी दिल्ली-हैदराबाद तेलंगणा एक्सप्रेसला बल्लारशाह-माजरी-पिंपळकुट्टी-सिकंदराबाद मार्गे वळवण्यात आले आहे. हजरत निझामुद्दीन- बंगळुरू राजधानी एक्सप्रेसला माजरी-पिंपळकुट्टी-सिकंदराबाद मार्गे वळवण्यात आले आहे. निझामुद्दीन-विशाखापट्टनम एक्सप्रेसला बुटीबोरी-नागपूर-रायपूर-तितलागड मार्गे वळवण्यात आले आहे. दानापूर- सिकंदराबाद सुपरफास्ट एक्सप्रेस, नवी दिल्ली-चेन्नई ग्रँड ट्रँक एक्सप्रेस आणि ओखा-पुरी एक्सप्रेसला सेवाग्राम मार्गे- बडनेरा- अकोला- सिकंदराबाद मार्गे वळवण्यात आले आहे.

आणखी वाचा-गडचिरोली: चालत्या बसचे छप्पर उडाल्याप्रकरणी विभागीय यंत्र अभियंता निलंबित

अहमदाबाद ते चेन्नई नवजीवन सुपरफास्ट एक्सप्रेस, जम्मूतवी- चेन्नई अंदमान एक्सप्रेसला वर्धा-नागपूर-रायपूर-तितलागड-विशाखापट्टणम-सिकंदराबाद मार्गे वळवण्यात आले आहे. नवी दिल्ली- त्रिवेंद्रम केरळ एक्स्प्रेस, नवी दिल्ली-चेन्नई तामिळनाडू एक्सप्रेस, जयपूर-म्हैसूर सुपरफास्ट एक्स्प्रेस, भगत की कोठी – तिरुच्चिराप्पल्लि हमसफर एक्सप्रेसला बडनेरा- मनमाड-दौंड- सोलापूर-वाडी मार्गे वळवण्यात आले आहे. त्रिवेंद्रम-नवी दिल्ली केरळ एक्स्प्रेसला विजयवाडा – दुव्वाद- विझियानगरम- रायगड- टिटलागड- रायपूर- नागपूर मार्गे वळवण्यात आले आहे. बंगळुरू-दानापूर एक्सप्रेसला विजयवाडा-दुव्वाडा- विझियानगरम- संबलपूर- बोंडामुंडा- बरकाकाना- गया मार्गे वळवण्यात येत आहे. चेन्नई-अहमदाबाद नवजीवन एक्स्प्रेस, चेन्नई-जम्मू तवी- अंदमान एक्स्प्रेसला गुंटूर मार्गे- पागडीपल्ली- सिकंदराबाद-वाडी- सोलापूर- दौंड- मनमाड- जळगाव- भुसावळ मार्गे वळवण्यात आले आहे. रामेश्वरम- बनारस साप्ताहिक सुपरफास्ट एक्स्प्रेसला विजयवाडा – दुव्वाद- विझियानगरम- टिटलागड- संबलपूर- झारसुगुडा- हातिया- मुरी- बरकाकाना- सासाराम मार्गे वळवण्यात आले आहे. हजरत निझामुद्दीन-रेनिगुंटा एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water on railway bridge change in route of many trains rbt 74 mrj
Show comments