नागपूर: बेझनबागजवळ सुरू असलेल्या उड्डाण पुलाच्या बांधकामा दरम्यान जलवाहिनी फुटल्याने शहरातील काही भागातील पाणी पुरवठा खंडित झाला आहे. बेझनबागजवळ उड्डाण पुलाचे बांधकाम सुरू आहे. जलवाहिनी फुटल्याने नझुल लेआउट, लुंबिनी नगर, हरिजन कॉलनी, जरीपटका, जिंगर माळी परिसर, महात्मा गांधी शाळा, बेझनबाग, दशरथ नगर, दयानंद पार्क समोरील वस्त्या, सीएसपीडीआय रोड, गार्डन लेआउट, सुदर्शन कॉलनी आदी भागातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला असून जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरू आहे. काम पूर्ण झाल्यावर पाणी पुरवठा सुरळीत केला जाणार असल्याचे पाणी पुरवठा वितरण कंपनी ओसीडब्ल्यूने कळवले आहे.
नागपुरात बांधकामा दरम्यान जलवाहिनी फुटली, ‘या’ वस्त्यांचा पाणी पुरवठा विस्कळीत
काम पूर्ण झाल्यावर पाणी पुरवठा सुरळीत केला जाणार असल्याचे पाणी पुरवठा वितरण कंपनी ओसीडब्ल्यूने कळवले आहे.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 28-02-2023 at 17:48 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water pipeline break during construction in nagpur cwb 76 zws