नागपूर  :  बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाच्या भविष्यातील विस्तारासाठी आवश्यक पाण्याचे  नियोजन करण्यास मंजुरी तसेच चंद्रपूर येथे प्रस्तावित  आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाच्या निर्मीतीसाठी सल्लागार नेमण्याच्या प्रक्रीयेला गती देण्याचे निर्देश वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी येथे दिले.     

हेही वाचा >>> ताडोबा बफरच्या जंगलात फिरणाऱ्यांकडून वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यास शिवीगाळ

mahajyoti obc loksatta news
ओबीसी विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय : ‘महाज्योती’चे ५ जिल्ह्यांत ‘उत्कृष्टता केंद्रे’ स्थापन होणार…
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
what is the genome india project why it matters
विश्लेषण : जिनोमइंडिया प्रकल्प भारतासाठी किती महत्त्वाचा?
mp dr amol kolhe
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा मार्ग बदलण्यास विरोध- लढा उभारण्याचा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा इशारा
policy will be prepared to resolve issues related to biodiversity parks says madhuri misal
राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे ‘बीडीपी’बाबत मोठे वक्तव्य, म्हणाल्या…
Guidelines for tourists Committee formed Nagpur news
पर्यटकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे; समितीची स्थापना
Loksatta kutuhal Founder of the Paleontological Institute
कुतूहल: पुराजीवविज्ञान संस्थेचे संस्थापक
assistant professor without NET-SET
सहायक प्राध्यापक होणे नेट-सेटशिवायही शक्य?

महाराष्ट्र वनविकास महामंडळाच्या संचालक मंडळाची  बैठक वन मंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष  मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली येथील हिंगणा रोडवर स्थित महामंडळाच्या मुख्यालयात पार पडली. वन विभागाचे प्रधान सचिव बी.वेणुगोपाल रेड्डी (दूरदृष्य प्रणाली द्वारे), प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. वाय. एल. पी. राव, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विकास गुप्ता, मुख्य महाव्यवस्थापक संजीव गौड, कंपनी सचिव सौरभ सिंह उपस्थित होते. गोरेवाडा प्रकल्पांतर्गत भविष्यात सुरु करण्यात येणाऱ्या आफ्रिकन सफारी, नाईट सफारी, गोंडवाना संग्रहालय आदी प्रकल्पांच्या संचलनासाठी पाण्याच्या व्यवस्थेचे नियोजन नागपूर महानगरपालिकेमार्फत तसेच स्वत: महामंडळाने पाईपलाईनद्वारे करण्यास मुनगंटीवार यांनी मान्यता दिली. गोरेवाडाच्या धर्तीवर चंद्रपूर येथे प्रस्तावित  प्राणी उद्यानाच्या निर्मीतीसाठी महामंडळाला सल्लागार नेमण्याकरिता निविदा काढण्याची सूचना करण्यात आली होती. त्यानुसार सदर प्रस्तावास शासनाकडून मंजुरीसाठी पाठपुरावा करण्याचे निर्देश  मुनगंटीवार यांनी दिले.

Story img Loader