पालकमंत्र्यांचा जनता दरबार

मध्य नागपूरच्या पंचवटीनगर, बिनाकी लेआऊट, शांतीनगर, लालगंज-खैरीपुरा, चकना चौकसह इतर काही भागात नागरिकांना गढूळ  पाण्याचा पुरवठा होत आहे. काही भागात रस्ते खराब आहेत. शांतीनगर बाजारातून फेरीवाल्यांना  हाकलले जात असल्याचा आरोप करत नागरिकांनी पालकमंत्र्यांच्या सतरंजीपुरा येथील जनता दरबारात काही काळ  गोंधळ घातला.

याप्रसंगी महापौर नंदा जिचकार, आमदार कृष्णा खोपडे, डॉ. मिलिंद माने, महापालिका आयुक्त अभिजित बांगर, दीपराज पार्डीकर, नगरसेवक रमेश पुणेकर, आभा पांडे  उपस्थित होते.

शांतीनगर बाजाराचा प्रश्न नरेंद्र पुरी यांनी मांडला.  महापालिका आणि पोलीस अधिकारी फेरीवाल्यांना हालकून लावतात. फेरीवाल्यांचा सुमारे ३० लाखांचा भाजीपाला वाया गेल्याचा आरोप महिलेने केला. संतप्त विक्रेत्यांनी मंचापुढे ठिय्या दिला.

पालकमंत्र्यांनी हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे निकाल येईपर्यंत फेरीवाल्यांना व्यवसाय करू न देण्याची मुभा देण्याची  सूचना केली, परंतु न्यायालयाचा निर्णय सर्वानी मान्य करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.

मिलिंद मानापुरे यांनी  मध्य नागपूरातील पाण्याचा प्रश्न मांडला. पंचवटीनगर, बिनाकी लेआऊट, येथे १० मिनिटेही पाणीपुरवठा होत नाही. याकडे लक्ष वेधले. मध्य नागपूरच्या काही भागात रस्तेही खराब असल्याचा आरोप याप्रसंगी करण्यात आला. नाईक तलावात महापालिकेने गडर लाईनचे पाणी सोडल्याची तक्रार याप्रसंगी करण्यात आली. पालकमंत्र्यांनी सर्व प्रश्न तातडीने सोडवण्याचे आश्वासन याप्रसंगी दिले. घाण विहीर स्वच्छ करण्याचा प्रस्ताव तातडीने देण्याचे सांगत त्यामुळे भविष्यात पाण्याची टंचाई जाणवणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

नगरसेवक हरवले

नगरसेवक संजय चावरे याचे दर्शन होत नसल्याची तक्रार रजनी मोहाडीकर या महिलेने केली. अत्यंत संतप्त भावना या महिलेने नगरसेवकाबद्दल आणि वार्डातील समस्या मांडल्या. नगरसेवकाची पूजा करण्यासाठी या महिलेने पूजेचे ताटही सोबत आणले होते. पूजेचे ताट घेऊन ही महिला व्यासपीठावर चढणार तोच पोलिसांनी तिला आवरले. याप्रसंगी दुसरा एक व्यक्ती नगरसेवकाची तक्रारीसाठी उठला असता तो तडीपार असल्याचे सांगत एकाने आक्षेप घेतल्यामुळे दोघांमध्ये पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने वाद  टळला.

भाजप पदाधिकारीकडून अविश्वास

भाजपचे शहर उपाध्यक्ष भूषण दडवे यांनी मोतीबाग ते मारवाडी चौक, गोळीबार चौक ते मध्य नागपूरच्या काही भागातील अतिक्रमणाचा मुद्दा मांडला. पालकमंत्र्यांचे आदेशही कोणी पाळत नसल्याचा आरोप केला.  त्यावर पालकमंत्री संतापले. दुसऱ्या एका तक्रारीत एकाने शांतीनगर भागात शासनाची सुमारे एक एकड जागेवर एका सोसायटीने ताबा मिळवत ते इतरांना विकल्याचा आरोप केला. याप्रसंगी चंदू मेयर हे माजी नगरसेवकांचीही त्यांना साथ असल्याचे सांगितले.

Story img Loader