बुलढाणा: यंदा झालेल्या अपुऱ्या पावसामुळे ग्रामीणच नव्हे तर जिल्ह्याच्या शहरी भागातही पाणी टंचाईची चिन्हे आहेत. यामुळे पर्यायी योजनांसाठी सव्वा कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यंदा जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला आहे. यामुळे प्रशासन सतर्क असून संभाव्य उपाय योजनांचा कृती आराखडा तयार करण्यात येत आहे. उन्हाळ्यात नागरी भागातही टंचाईची दाट शक्यता आहे. यामुळे ११ नगर परिषद व २ नगरपंचायत क्षेत्रात उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाईचा आढावा घेण्यात आला. याचा अहवाल नुकतेच जिल्हा प्रसाशनास सादर करण्यात आला.

हेही वाचा… “देके खातेदारोको दुख, क्या मिलेगा तुझे चैनसुख?”, मलकापूर अर्बनच्या ठेवीदारांचा संभाजीनगरातही एल्गार

अहवालानुसार उन्हाळ्याच्या अंतिम टप्प्यात चार नागरी क्षेत्रात पर्यायी उपाय योजना करणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. उर्वरित ९ पालिका क्षेत्रात उन्हाळ्यात पाणी टंचाईची स्थिती उद्भवणार नाही असे अहवालात नमूद आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चे कार्यकारी अभियंता के. बी. यांनी हा अहवाल दिला आहे.

हद्दवाढ भागांत स्वखर्चाने टँकर

दरम्यान शेगाव नगरीची अलीकडे हद्धवाढ झाली आहे. यामुळे पालिका क्षेत्राची लोकसंख्या ८५ हजारपर्यंत पोहोचली. हद्धवाढ झाल्याने रोकडीया नगर, जमजम नगर,आझाद नगर, खिरणीचा मळा, सुरभी कॉलनी आदी भाग पालिका क्षेत्रात आले . मात्र या भागात पाईपलाईन नाही. यामुळे टंचाई निवारणासाठी स्वखर्चाने टँकर द्वारे पाणीपुरवठा करण्याचे पालिकेचे नियोजन आहे.

४५ हजार लोकवस्तीच्या देऊळगाव नगरीत उन्हाळा अखेरीस आवश्यकतेनुसार धरणात चर खोदण्यात येणार आहे. २०हजार लोकसंख्येच्या सिंदखेडराजा नगर परिषदेचे, पाणी संपल्यावर धरणात चर खोदून पाणी पुरवठा करण्याचे नियोजन आहे. या दोन्ही कामावर प्रत्येकी ५० लक्ष मिळून १ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.मोताळा मध्ये पाणी नसल्यास धरणात चर खोदून पुरवठा करण्यात येणार आहे. यासाठी ४० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे १ कोटी २० लक्ष रुपयांचा हा आराखडा आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water scarcity due to insufficient rainfall a plan of more than one crore has been prepared for alternative schemes buldhana scm 61 dvr
Show comments