बुलढाणा जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या आहे. यामुळे शेकडो गावांतील लाखो ग्रामस्थांचे पाण्यासाठी हाल होत आहे. जिल्ह्यातील ४६ गावांवर टंचाईचे सावट पसरले आहे. जलस्रोत कोरडे पडल्याने व पर्यायी योजना नसल्याने टँकरशिवाय दुसरा पर्याय उरला नाही. सध्या ५ तालुक्यातील ४६ गावांना टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये देऊळगाव राजा तालुक्यातील ११, चिखली मधील १०, बुलढाण्यातील १२, मेहकरमधील ९ तर मोताळा तालुक्यातील ४ गावांचा समावेश आहे. या ४६ गावांची लोकसंख्या १ लाख ४४ हजार ६४० इतकी आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा… यवतमाळ : वादळ, पावसाचा तडाखा, २०४ वीज खांब कोसळले, २४३ गावात काळोख, सहा उपकेंद्रातील वीज पुरवठा खंडीत

हेही वाचा… पत्नीच्या चारित्र्यावर संशय; वडिलांनीच केली एका दिवसाच्या बाळाची हत्या

खासगी अधिग्रहित विहिरींद्वारे तहान भागविल्या जाणाऱ्या गावांची संख्या १३६ इतकी आहे. यासाठी १६८ खासगी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहे. सुमारे एक लाख लोकवस्तीच्या या गावातील रहिवाशांचे टंचाईमुळे बेहाल होत आहे. लोकसभा लढून दमलेले सर्वपक्षीय नेते आता विश्रांती घेत आहे. त्यात आचारसंहिताचे कारण आहे. यंत्रणा निवडणुकीनंतरच्या व अन्य कामात व्यस्त आहे. यामुळे जनतेला कोणी वालीच उरला नसल्याचे भीषण चित्र आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water scarcity in 1 villages of buldhana district scm 61 asj