गेल्या पाच दिवसांपासून जिल्ह्यात अधूनमधून पाऊस येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता कमी झाली आहे. जिल्ह्यात जंगलाचे प्रमाण मोठे असल्यामुळे जंगलांतून येणारे पाणी जलाशयांत जमा होत आहे. त्यामुळेच अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इटियाडोह धरणातील पाणी साठ्यात वाढ होत आहे. गुरुवारी ९५.४९ टक्के पाणीसाठा झाला.

गुरुवारी दुपारी ४ वाजतापासून जिल्ह्यात पावसाने दमदार पुनरागमन केले. त्यामुळे येत्या काही तासांत धरण ओव्हरफ्लो होण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाने वर्तविली आहे. यावर्षी पावसाने शेतकऱ्यांना चांगलेच मेटाकुटीस आणले. पावसाच्या अपुरेपणामुळे धान पिकावर त्याचा परिणाम झाला. ऑगस्ट महिन्याच्या शेवट्च्या आठवड्यात पावसाची नितांत गरज होती. मात्र, पाऊस झाला नाही. तब्बल १५ दिवसांपेक्षा जास्त काळ पावसाने दड़ी मारली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीक जगविण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते.

Traders reported that price of coriander decreased compared to last week and price of fenugreek is on rise
कोथिंबिरेच्या दरात घट; मेथी तेजीत, फळभाज्यांचे दर स्थिर
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Marathwada vidarbh farmers
विश्लेषण: सोयाबीनच्या हमीभावावरून शेतकऱ्यांची नाराजी का? ७० हून अधिक मतदारसंघांमध्ये ठरणार निर्णायक मुद्दा?
Bad weather in Mumbai Measures against pollution Mumbai print news
मुंबईत निवडणुकीपर्यंत प्रदूषणाचा त्रास; मनुष्यबळाअभावी पालिकेची यंत्रणा हतबल
maharashtra assembly elections 2024 security need in maharashtra
‘सेफ’ राहण्यासाठी, एक होण्यापेक्षा…
manipur violence 10 militants killed in encounter with crpf
अन्वयार्थ : अशांत मणिपूर, अस्वस्थ नागालँड
supriya sule
‘बटेंगे तो कटेंगे’वरून भाजपमध्ये दुफळी, सुप्रिया सुळे यांचा दावा
Uran paddy fields, wild boars damage paddy fields,
उरण : रानडुकरांमुळे भातशेतीचे नुकसान, वन, कृषी विभागाचे दुर्लक्ष; शेतीची राखण करण्याची शेतकऱ्यांवर वेळ

हेही वाचा >>> गोंदियात मुसळधार पाऊस; रस्ते बंद; मारबत-बडगे मिरवणुकीच्या उत्साहावर विरजण

त्यातच आता गेल्या पाच दिवसांपासून अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत. काही ठिकाणी दमदार पावसाच्या सरी बसरल्या. त्यामुळे बांध्यांमध्ये पाणी साचले. नद्या आणि नाले देखील प्रवाहित झाले आहेत. धरणांतील पाणी साठ्यात वाढ होऊ लागली आहे. सततच्या पावसामुळे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इटियाडोह धरण गुरुवारी सकाळी ९५.४९ टक्के भरले. पाण्याचा प्रवाह सुरूच आहे. त्यामुळे धरण ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. गाढवी नदीवरील  इटियाटोह धरणाचा ओव्हरफ्लो बघण्याची मजा काही वेगळीच असते.

त्यातच पोळा  सणाला लागून सुट्टया आल्यामुळे ओव्हरफ्लो बघण्यासाठी पर्यटकांचा ओढा वाढण्याची शक्यता आहे. गुरुवारी सकाळपासून आकाशात ढग जमले होते. मात्र, पाऊस आला नाही. दुपारी चार वाजताच्या सुमारास जिल्ह्यात सर्वदूर दमदार पावसाने पुनरागमन केले. विजांचा कटकडाट आणि पाऊस ऐन पोळा फुटण्याच्या वेळेवर सुरू झाला. त्यामुळे पोळा सणाच्या उत्सव आणि आनंदावर विरजन पडले असले तरी आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.

हेही वाचा >>> “अजित पवारांच्या चेहऱ्यावर अपराधीपणा आणि…”; काँग्रेस नेत्याचं वक्तव्य, म्हणाले…

जिल्ह्यातील नद्या आणि नाल्यांतून देखील पाण्याचा प्रवाह सुरू झाला आहे. त्यामुळे इतर नद्यांना देखील पूर येण्याची शक्यता वर्तविली आहे.

धरणातील जलसाठा

इटियाडोह प्रकल्पाची साठवण क्षमता ३६७.२५९ मीटर इतकी आहे. धरणात आज ३०३.५४९ मीटर इतका पाणीसाठा असून टक्केवारी ९५.४८ इतकी आहे. शिरपूर प्रकल्पाची क्षमता १२३.६३०मीटर असून धरणात ११२.३१० मीटर आहे. त्याची टक्केवारी ७०.२९ इतकी आहे. कालीसरार प्रकल्पात सध्या ७३.२६ टक्के पाणी आहे. पुजारीटोला प्रकल्पात ७६.७४ टक्के आणि धापेवाडा प्रकल्पात ३२.१६ टक्के पाण्याची नोंद  करण्यात आली आहे.

नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा पाणी पातळी वाढत असल्यामुळे धरण ओव्हरफ्लो होऊ होऊ शकतो. त्यामुळे नदी काठावरील केशोरी, प्रतापगड, तिबेट कॅम्प, गोठनगाव , सुरबन अशा सर्व गावांना सतर्कतेच्या इशारा दिला आहे. नदीपात्रातून आवागमन करणाऱ्या सर्व संबंधित व्यक्तींना पूर नियंत्रण कक्षाने अतीदक्षतेचा इशारा दिला आहे.