गोंदिया : जिल्हयातील आमगाव व सालेकसा तालुक्यातील ४८ गावे व शहरांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी बनगाव प्रादेशिक ग्रामीण पाणीपुरवठा योजना नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. विविध कारणांमुळे ही योजना वारंवार बंद पडल्याने ५ हजार १०० हून अधिक नळजोडणी धारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. १० डिसेंबर रोजी या योजनेच्या कांगाटोला गावात असलेल्या जलशुद्धीकरण केंद्रातील पंपाच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने योजनेत समाविष्ट गावांना पाणीपुरवठा झाला नव्हताच पुन्हा ३ दिवसही लोटत नाहीत. तोच त्यानंतर १३ डिसेंबर रोजी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे देवरी शाखा अभियंता राजेंद्र सातदेवे यांनी सांगितले की, बणगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या जलशुद्धीकरण केंद्रातील ऑन-ग्रीड सोलर व पंप दुरुस्ती व इतर आवश्यक कामांमुळे सोमवार १६ व मंगळवार १७ डिसेंबर रोजी सर्व पुन्हा आमगाव आणि सालेकसा तालुक्यातील या ४८ गावांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे लाभक्षेत्रात येणाऱ्या दोन्ही तालुक्यांतील ४८ गावे व शहरांतील नागरिकांना पुन्हा पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. सध्या पण दोन दिवसाआड पाणीपुरवठा बंदच होत असल्याची चर्चा येथील रहिवासी करित आहेत. मात्र या वेळी ही दोन दिवसात दुरुस्तीची कामे पूर्णपणे होतात की यापेक्षा जास्त वेळ लागेल हे काहीच नाकारता येत नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा