लोकसत्ता टीम

नागपूर: उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढलेली असतानाच शहरातील मेडिकल चौक परिसरात जल वाहिनी फुटली. त्यामुळे तेथून पाणी वाहात आहे.

शहराला पाणीपुरवठा करणारी कंपनी ओसीडब्लूने जल वाहिनी दुरूस्तीचे काम हाती घेतले आहे. जल वाहिनी फुटल्याने अजनी रेल्वे, टाटा कॅपिटल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला पाणी पुरवठा होणार नाही, असे ओसीडब्लूने कळवले आहे.

Story img Loader