अकोला : जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळे शहराच्या विविध भागातील पाणीपुरवठा तीन दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात नागरिकांची पाण्यासाठी अडचण होणार आहे.
अकोला ते महान मुख्य जल दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. ५ ते ७ ऑगस्टदरम्यान २५ एमएलडीवरून होणारा पाणीपुरवठा बंद राहील. शहरातील शिवनगर, आश्रयनगर व बसस्थानकामागील जलकुंभ अंतर्गत शिवणी जलकुंभ, शिवर जलकुंभ, शिवापूर जलकुंभाअंतर्गत येणाऱ्या भागांचा पाणीपुरवठा होणार नाही. तसेच ६५ एमएलडी प्रकल्पावरील होणारा पाणीपुरवठा सुरळीत राहणार आहे. त्यामध्ये महाजनी जलकुंभ, तोष्णीवाल जलकुंभ, आदर्श कॉलनी, जलकुंभ, केशवनगर जलकुंभ, नेहरू पार्क जलकुंभ, रेल्वे स्टेशन जलकुंभ, गंगानगर जलकुंभ, अकोट फैल जलकुंभ, जोगळेकर प्लॉट जलकुंभ, लोकमान्य नगर जलकुंभ, गुडधी जलकुंभ अंतर्गत येणाऱ्या भागांचा समावेश आहे.
शहरातील नागरिकांनी पिण्याच्या पाण्याची पुरेशी साठवणूक करून पाण्याचा अपव्यय टाळावा, काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहन महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी केले आहे.