लोकसत्ता टीम

चंद्रपूर: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षावर झालेला भ्याड हल्ला निदंनीय असून राजकीय नेत्यावर गोळीबार करून जिल्ह्यात दहशत माजवणारी पहिलीच घटना आहे. त्यामुळे दहशत माजविणाऱ्या आरोपीसोबतच मास्टरमाईंडचा पोलिसांनी तातडीने छडा लावावा. अन्यथा जिल्हाभर आंदोलन उभारू, असा इशारा माजी मंत्री आ. विजय वडेट्टीवार यांनी दिला.

Shiv Sena Shinde group strategizes for party growth before upcoming Pune Municipal Corporation elections
पुण्यावर शिंदे गटाचा ‘आवाज’ वाढणार
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
allegations over the post of Guardian Minister of Raigad
रायगडच्या पालकमंत्रीपदावरून आरोपप्रत्यारोप
Yashomati Thakur warned that distributing trishuls could lead to violence and threaten law and order
अमरावती जिल्ह्यात काही संघटनाकडून शस्त्रांचे वाटप, यशोमती ठाकूर यांचा आरोप
beggar murder news in Pune,update in marathi
पुण्यातील लष्कर भागात भिक्षेकऱ्याची मारहाण करुन हत्या
Pune Municipal Corporation news in marathi
प्रशासन राज आणि चुकलेला ‘अंदाज’
Thane , Eknath Shinde , Uddhav Thackeray group,
आरोप, शिव्याशाप देत राहिले तर वीसच्या पुढचा शुन्यही निघून जाईल, एकनाथ शिंदेंचा ठाकरे गटाला टोला
14 Naxalites killed in encounter on Chhattisgarh Odisha border gadchiroli news
नक्षलवाद्यांच्या आणखी एका मोठ्या नेत्याला कंठस्नान, मिलिंद तेलतुंबडेनंतर…

११ मे ला रात्री ९.२० वाजताचे सुमारास झालेल्या भ्याड हल्ल्यातून बचावलेले चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्या निवासस्थानी दिलेल्या भेटीप्रसंगी आ. वडेट्टीवार बोलत होते. जिल्ह्याच्या इतिहासात एखाद्या राजकीय नेत्यावर हल्ला होण्याची पहिलीच घटना आहे. धार्मिक आणि सामाजीक कार्यात अग्रेसर असलेल्या संतोषसिंह रावत यांचे जिल्ह्यात कोणाशीही वैयक्तिक वैर नाही, असे असताना त्यांच्यावर पाळत ठेवून गोळी झाडल्या जावी, ही घटना विकृत मानसिकतेचे द्योतक असल्याचे आ. वडेट्टीवार म्हणाले.

आणखी वाचा-अकोला: दोन गटातील वादातून दगडफेक, एकाचा मृत्यू; शहरात जमावबंदी लागू

संतोष रावत यांच्यावर भ्याड हल्ला होऊन तीन दिवस झाले, परंतु अद्यापपर्यंत हल्लेखोरांचा शोध लागलेला नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या असून दिवसेंदिवस तीव्र होत आहेत. भविष्यात कार्यकर्त्यांच्या भावनांचा उद्रेक होवू नये म्हणून पोलीस विभागाने सदर प्रकरणाचा तपास करताना जात, धर्म, पक्ष आणि पद याची तमा न बाळगता आरोपींना पडद्यासमोर आणावे, अन्यथा सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांच्या सहकार्याने जिल्हाभर निषेध सभा, रास्ता रोको आणि बंद पाडू. पहिली निषेध सभा स्थानिक गांधी चौकात घेण्यात येईल, असेही वडेट्टीवार यांनी सांगितले.

Story img Loader