नागपूर : ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने’साठी नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमधून आतापर्यंत ३ लाख १ हजार १३४ महिलांनी अर्ज भरले आहेत. मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी राज्यात ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने’च्या नोंदणीचा शुक्रवारी दुरदृश्यसंवादप्रणालीद्वारे राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिकांचे आयुक्त यांच्याकडून आढावा घेतला. विभागीय आयुक्त विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यावेळी उपस्थित होत्या. या योजनेच्या नोंदणीसाठी येत्या काहीदिवसात वेबपोर्टल सुरु करुन ही प्रक्रिया गतीमान करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या योजनेच्या लाभासाठी नोंदणी करण्यात येणाऱ्या सर्व मदत केंद्रावर योजनेच्या माहितीचे फलक लावण्याच्या सूचना करण्यात आल्या. मोबाईल ॲपद्वारे अर्ज करण्यासाठी आता अंगणवाडी सेविकांबरोबरच ग्राम स्तरावरील अन्य कर्मचाऱ्यांनाही नियुक्त करण्यात येणार आहे. नवीन बदलांसह शुक्रवारी या योजनेसंदर्भातील सुधारित शासननिर्णय निर्गमित होणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

दरम्यान, नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमधील ग्रामीण व शहरी भागातील मदत केंद्रांवर ११ जुलै २०२४ पर्यंत ७५ हजार ४९९ ऑनलाईन तर २ लाख २५ हजार ६३५ ऑफलाईन असे एकूण ३ लाख १ हजार १३४ अर्ज प्राप्त झाले आहेत. नागपूर जिल्ह्यामध्ये १ लाख ८ हजार ४४१ अर्ज, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये १६ हजार ३४९ अर्ज, गडचिरोली जिल्ह्यामध्ये १ लाख ५ हजार ४२ अर्ज, वर्धा जिल्ह्यामध्ये १२ हजार ४४९ अर्ज, भंडारा जिल्ह्यामध्ये ३० हजार ७१९ अर्ज आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये २८ हजार १४४ अर्ज प्राप्त झाल्याची माहिती श्रीमती बिदरी यांनी दिली. नागपूर व चंद्रपूर महानगरपालिकांमध्ये ३२ हजार ४३५ अर्ज प्राप्त झाले आहेत. नागपूर महापालिकेने एकूण १० प्रशासकीय प्रभाग आणि ३८ निवडणूक प्रभागांमध्ये एकूण ४८ मदत केंद्र सुरू केले आहेत.

Bluetooth 6.0 introduces channel sounding
Bluetooth 6.0 लेटेस्ट व्हर्जन, ऑडिओ, व्हिडीओ ते डॉक्युमेंट्स शेअर करण्याची असणार सोय; कोणत्या फोन, डिव्हाईसमध्ये चालेल?
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
TET, AI Technology TET, TET candidates,
टीईटी परीक्षेत एआय तंत्रज्ञान वापरल्याचा परिणाम काय? किती उमेदवारांनी दिली परीक्षा?
Eurasian Water Cat Pune District, Indapur,
पुणे जिल्ह्यात प्रथमच दुर्मीळ ‘युरेशियन पाणमांजरा’चा शोध, इंदापूरमधील विहिरीमध्ये पडलेल्या पाणमांजराची सुटका
Crime against MNS candidate in Nashik East Constituency
नाशिक पूर्व मतदार संघातील मनसे उमेदवाराविरुध्द गुन्हा, पक्ष सचिवाच्या घरात लूट
success story of utham gowda started his own startup owner of captain fresh company
जास्त पगाराची नोकरी सोडली अन् घेतली ‘ही’ जोखीम, आता आहेत कोटींचे मालक; वाचा उथम गौडा यांचा प्रेरणादायी प्रवास
PM Vidyalakshmi Scheme
उच्च शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना मिळणार १० लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज; काय आहे ‘पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजना’?
Viral video of disabled swiggy delivery boy doing food delivery by riding a cycle
परिश्रमाशिवाय पर्याय नाही! दिव्यांग असूनही करतोय फूड डिलिव्हरी, VIDEO पाहून वाटेल अभिमान

हेही वाचा : बुलढाणा: गूढ आत्महत्या! तरुण शेतकरी, सासुरवाडीतील रात्र, मंदिराच्या घंटीला भगवे वस्त्र…

जास्तीत-जास्त नोंदणी करण्याचे विभागीय आयुक्तांचे आवाहन विभागातील सर्व जिल्ह्यांतील ग्रामीण व शहरी भागांमधील महिलांनी ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने’च्या लाभासाठी जास्तीत-जास्त संख्येने नोंदणी करण्याचे आवाहन विभागीय आयुक्त श्रीमती बिदरी यांनी केले आहे. २१ ते ६५ वयोगटातील व २.५० लाखांपर्यंत कुटुंबाचे उत्पन्न असणाऱ्या महिलांना या योजनेसाठी नोंदणी करता येणार आहे. ज्या महिलांकडे १५ वर्ष पुर्वीचे केशरी व पिवळे रेशनकार्ड आहे त्यांना उत्पन्नच्या दाखल्याची गरज नाही. नोंदणीच्यावेळी आधारकार्डवरील नाव, पत्ता, आधारक्रमांक तसेच बॅंकखाते आदी माहिती अचूकपणे नोंदविण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

हेही वाचा : आता ताडोबाच नाही तर नवेगावातही व्याघ्रदर्शन..

आढावा बैठकीस विकास उपायुक्त तथा या योजनेच्या अंमलबजावणीसाठी नियुक्त विभागीय नोडल अधिकारी कमलकिशोर फुटाणे, नगर प्रशासन उपायुक्त श्री. शहा, प्रशांत व्यवहारे आदी उपस्थित होते. तसेच नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयातून प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे, सर्व उपविभागीय अधिकारी उपस्थित होते.