नागपूर : ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने’साठी नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमधून आतापर्यंत ३ लाख १ हजार १३४ महिलांनी अर्ज भरले आहेत. मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी राज्यात ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने’च्या नोंदणीचा शुक्रवारी दुरदृश्यसंवादप्रणालीद्वारे राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिकांचे आयुक्त यांच्याकडून आढावा घेतला. विभागीय आयुक्त विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यावेळी उपस्थित होत्या. या योजनेच्या नोंदणीसाठी येत्या काहीदिवसात वेबपोर्टल सुरु करुन ही प्रक्रिया गतीमान करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या योजनेच्या लाभासाठी नोंदणी करण्यात येणाऱ्या सर्व मदत केंद्रावर योजनेच्या माहितीचे फलक लावण्याच्या सूचना करण्यात आल्या. मोबाईल ॲपद्वारे अर्ज करण्यासाठी आता अंगणवाडी सेविकांबरोबरच ग्राम स्तरावरील अन्य कर्मचाऱ्यांनाही नियुक्त करण्यात येणार आहे. नवीन बदलांसह शुक्रवारी या योजनेसंदर्भातील सुधारित शासननिर्णय निर्गमित होणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा