बुलढाणा : मेहकर येथील एमईएस महाविद्यालयाचे संकेतस्थळ (वेबसाईट) हॅक करण्यात आल्याचे आज शुक्रवारी उघड झाले. सायबर पोलिसांनी याची माहिती संस्थेला दिली असून सर्व माहिती (डेटा) सुरक्षित आहे. स्थळ सुरू करताच ‘पाकिस्तान जिंदाबाद’ असे वाक्य व पाकिस्तानी राष्ट्रध्वज दिसत असल्याचे सुत्रांनी सांगितले.
मुळातच फारसा वापर नसणारे हे संकेतस्थळ होते. त्यातील ‘लुपहोल’ शोधून संबंधितांनी हा कारणामा केल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. संकेतस्थळ तयार करणाऱ्या तज्ज्ञाने ती पूर्ववत केल्याचे सांगण्यात आले. प्रकरणी मेहकर पोलिस ठाण्यात तक्रार देनार असल्याचे प्राचार्य गणेश परिहार यांनी सांगितले.