नागपूर : भारतीय रेल्वेने रुळांचे वजन वाढवून रेल्वे मार्गाचे अद्यावतीकरण सुरू केले असून त्यामुळे भारतीय रेल्वे अधिक वेगवान होत आहे. देशात अनेक ठिकाणी अधिक वजनाचे रुळ टाकण्यात आले असून टप्प्याटप्प्याने सर्व महत्वाच्या रेल्वे मार्गावरील रुळांची क्षमता वाढण्यात येणार आहे. रेल्वेगाड्यांची गती वाढवण्यासाठी पायाभूत सुविधांचे अद्यावतीकरण करण्यात येत आहे. यामध्ये अधिक वजनाचे रुळ, सिंग्नल यंत्रणा आणि पुलांचे मजबुतीकरण आदींचा समावेश आहे. रेल्वे गाड्यांची गती ११० वरून १६० किमी प्रति तास करण्यासाठी रुळ अधिक वजनाचे वापरण्यात येत आहे. त्यासाठी सध्याचे रुळ आणि त्या खालील स्लीपरला बदलण्यात येत आहेत. सध्या जे रुळ आहेत त्यांचे वजन ५२ किलो प्रतिमीटर आहे. त्याऐवजी आता ६० किलो प्रतिमीटर वजनाचे रुळ टाकण्यात येत आहेत. या रुळांची वजन सहन करण्याची क्षमता अधिक आहे. या अधिक वजनाच्या रुळाखालील गिट्टी निघाली किंवा दरी (गॅप)निर्माण झाली तरी ते रुळ वाकणार नाहीत. त्यामुळे रेल्वेगाडी अधिक वेगाने धावणार आहे. तसेच रेल्वेळांमधील निर्माण होणारी दरी नष्ट करण्यासाठी रुळांची लांबी देखील वाढवण्यात येत आहे. ही लांबी ६५ मीटरपर्यंत वाढवण्यात येत आहे.

हेही वाचा : मोसमी पाऊस अकोला, पुसद येथे पोहोचला! उर्वरित विदर्भात मात्र…

During the blockade gold and silver worth six crores were seized Pune news
नाकाबंदीत पावणेसहा कोटींचे सोने, चांदी जप्त; ओैंध परिसरात कारवाई
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Mumbaikars contribution in mutual funds
म्युच्युअल फंडात मुंबईचाच सिंहाचा वाटा; १७.८३ लाख कोटींचे योगदान; मुंबईसह महाराष्ट्राच्या तुलनेत अन्य राज्यांत वाढती दरी
Reliance-Disney merger completed, Reliance-Disney,
रिलायन्स-डिस्ने यांचे ७०,३५२ कोटींचे महाविलीनीकरण पूर्ण
flying squads, Thane district code of conduct , assembly election
ठाणे : आचार संहितेच्या काळात २३ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त; लाखो लिटर दारू; ६ कोटींचे मोफत वाटप साहित्य; १ कोटींचे अंमली पदार्थ
Railway Accident in bihar
Railway Worker Crushed : एक्स्प्रेस पुढे जाण्याऐवजी मागे आली अन् रेल्वे कर्मचारी चिरडला; बिहारमध्ये भीषण अपघात!
mega block on central and western line for repair of railway tracks and signals system
Mumbai Local Train Update: रविवारी मध्य, पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक
cash seized south mumbai ahead of assembly elections in maharashtra
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईत कारवाई ; सव्वा दोन कोटींची रोख जप्त

याशिवाय सिंग्नल यंत्रणेचेही अद्यावतीकरण करण्यात येत आहे. ‘डबल डिस्टेंट सिग्नल’ यंत्रणा बसवण्यात येत आहे. या तंत्रज्ञानामुळे सर्व रेल्वेगाड्या पूर्ण क्षमतेने धावतील आणि अपघात होण्याची शक्यता देखील कमी होईल. या यंत्रणेमुळे रेल्वेगाड्यांना स्थानकाच्या बाहेर (आऊटरवर) देखील ताटकळत ठेवण्याची आवश्यकता राहणार नाही, असे मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्याने सांगितले.

१३० किमी प्रतितास वेगाने चाचणी

इटारसी- नागपूर दरम्यान धारखोह-घोडाडोंगरी येथे ६० किलोचे रुळ बसवण्यात आले आहे. यामुळे रेल्वे मार्गाची क्षमता वाढली आहे. या रेल्वे मार्गावरून १५० किलोमीटर गतीने देखील गाड्या धावू शकतील. काही ठिकाणी १३० किलोमीटर प्रतितासच्या वेगाने धावण्यासाठी चाचणी देखील झाली आहे. या उच्च क्षमता असलेल्या रुळांमुळे कंपण कमी होते. रुळांचे कंपण कमी होत असल्याने डबे रुळावरून घरण्यासाठी शक्यता कमी असते. रुळाचे वजन अधिक असल्याने रुळ एक-दुसऱ्याला जोडणारे सांधे देखील मजूबत राहणार आहेत.

हेही वाचा : देशाचे कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे काय आहे विदर्भ कनेक्शन ?

१ किलोमीटर अंतरावर १२० अधिक स्लीपर

६० किलो प्रति मीटर वजनाचे रुळ बसवण्यात येत आहे. याशिवाय स्लीपरची देखील संख्या वावढण्यात येत आहे. दर एक किलोमीटर अंतराच्या रेल्वे मार्गावर १६०० सिमेंट क्रॉक्रीटचे स्लीपर टाकण्यात येत आहे. पूर्वी १ किलोमीटर अंतरासाठी १५४० सिमेंट क्रॉक्रीटचे स्लीपर टाकण्यात येत होते. आता त्यापैकी १२० स्लीपर अधिक वापरण्यात येत आहे.