नागपूर : भारतीय रेल्वेने रुळांचे वजन वाढवून रेल्वे मार्गाचे अद्यावतीकरण सुरू केले असून त्यामुळे भारतीय रेल्वे अधिक वेगवान होत आहे. देशात अनेक ठिकाणी अधिक वजनाचे रुळ टाकण्यात आले असून टप्प्याटप्प्याने सर्व महत्वाच्या रेल्वे मार्गावरील रुळांची क्षमता वाढण्यात येणार आहे. रेल्वेगाड्यांची गती वाढवण्यासाठी पायाभूत सुविधांचे अद्यावतीकरण करण्यात येत आहे. यामध्ये अधिक वजनाचे रुळ, सिंग्नल यंत्रणा आणि पुलांचे मजबुतीकरण आदींचा समावेश आहे. रेल्वे गाड्यांची गती ११० वरून १६० किमी प्रति तास करण्यासाठी रुळ अधिक वजनाचे वापरण्यात येत आहे. त्यासाठी सध्याचे रुळ आणि त्या खालील स्लीपरला बदलण्यात येत आहेत. सध्या जे रुळ आहेत त्यांचे वजन ५२ किलो प्रतिमीटर आहे. त्याऐवजी आता ६० किलो प्रतिमीटर वजनाचे रुळ टाकण्यात येत आहेत. या रुळांची वजन सहन करण्याची क्षमता अधिक आहे. या अधिक वजनाच्या रुळाखालील गिट्टी निघाली किंवा दरी (गॅप)निर्माण झाली तरी ते रुळ वाकणार नाहीत. त्यामुळे रेल्वेगाडी अधिक वेगाने धावणार आहे. तसेच रेल्वेळांमधील निर्माण होणारी दरी नष्ट करण्यासाठी रुळांची लांबी देखील वाढवण्यात येत आहे. ही लांबी ६५ मीटरपर्यंत वाढवण्यात येत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा