लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यवतमाळ : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयावरील ताण कमी करण्यासाठी जुने सरकारी स्त्री रुग्णालय पाडून कोट्यवधी खर्च करून अद्ययावत महिला व बाल रुग्णालय उभारण्यात आले. गेल्या नऊ महिन्यात येथे गर्भवती महिलांची केवळ सामान्य प्रसूती करण्यात आली.

‘सिझेरियन’ करिता शल्यक्रियागृह नसल्याने ही सुसज्ज वास्तू शोभेची ठरली आहे. येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मोठ्या प्रमाणात प्रसुतीसाठी ग्रामीण व शहरी भागातून महिला येतात. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयावर क्षमता नसताना अतिरिक्त ताण पडत आहे. त्यामुळे महिला व नवजात बाल रुग्णालय उभारण्यात आले. या रुग्णालयामुळे ग्रामीण महिलांची होणारी हेळसांड काही प्रमाणात थांबली आहे.

आणखी वाचा-गोंदिया : देवपायली येथे विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू

स्त्री रुग्णालय सुरू झाले तरी अजूनही शल्यक्रियागृहाचे काम पूर्ण झाले नाही. १०० बेडचे रुग्णालय असले तरी पूर्ण क्षमतेने सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत. प्रशासनाने वारंवार शस्त्रक्रिया गृहासंदर्भात बांधकाम विभागाकडे पाठपुरावा केला. त्यानंतर आता लवकरच शस्त्रक्रियागृहाचे काम पूर्णत्वास येणार असल्याचे सांगितले जाते. एकूण मंजूर पदांपैकी ७० टक्के पदे भरण्यात आली.. बालरोगतज्ज्ञ म्हणून वैद्यकीय अधीक्षक डॉ. रवीशेखर पाटील स्वत: कार्यरत आहेत. बाह्यरुग्ण विभागात दररोज ग्रामीण व शहरी भागातील गर्भवती असणार्‍या ३० पेक्षा जास्त महिलांची तपासणी केली जाते. स्त्री रुग्णालयात सरासरी दररोज पाच ते सहा सामान्य प्रसूती होत आहेत.

आणखी वाचा-अमरावती : बिबट मृतावस्‍थेत आढळला, अज्ञात वाहनाची धडक

आतापर्यंत ३८२ महिलांची सामान्य प्रसूती झाली. वैद्यकीय महाविद्यालयात प्रसूतीसाठी येणार्‍या आणि त्यांची सामान्य प्रसूती होणार असेल तर स्त्री रुग्णालयात हलविण्यात येते. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयावर येणारा ताण काही प्रमाणात कमी झाला आहे. शस्त्रक्रियागृह सुरू झाल्यास सिझरही येथेच करता येणार आहे. त्यासाठी लवकरात लवकर ओटीचे काम पूर्ण होणे आवश्यक आहे.

महिला व नवजात बाल रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात नियमित गर्भवती महिलांची तपासणी केली जाते. दररोज सामान्य पाच ते सहा प्रसूती होतात. शस्त्रक्रीयागृहाचे काम लवकरच पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू असून त्यादृष्टीने पाठपुरावा सुरू असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुखदेव राठोड यांनी सांगितले.