वर्धा : काही दिवसांत गणपती बाप्पाचे धडाक्यात आगमन होणार. घरी तसेच सार्वजनिक ठिकाणी उत्सव होणार. मात्र गणपती मंडळास असा सार्वजनिक उत्सव साजरा करताना खबरदारी घेणे आवश्यक आहे. उत्सवसाठी काही परवानग्या आवश्यक असतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यात महत्त्वाची बाब म्हणजे मंडप टाकण्याची होय. रस्त्यावर मंडप टाकण्यापूर्वी पोलीस व स्थानिक स्वराज्य संस्थांची परवानगी आवश्यक ठरते. कारण या दहा दिवसांच्या उत्सवात अनुचित घटना घडू नये म्हणून प्रशासन सतर्क असते. मंडळास नगरपालिका, महापालिका किंवा ग्रामपंचायत यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते. त्यासाठी मंडळाची नोंदणी, जागेच्या मालकाचे संमतीपत्र, घरकर पावती,आधारकार्ड अशी कागदपत्रे प्रामुख्याने द्यावी लागतात. पालिकेने मंजुरी दिली की मग काही अटी टाकून पोलीस प्रशासन ना हरकत प्रमाणपत्र देते.

हेही वाचा – गडचिरोली : अबब… ‘या’ लाकडी बैलजोडीची किंमत वाचून तुम्हालाही फुटेल घाम, जिल्हाभरात चर्चेचा विषय

हेही वाचा – वर्धा : लाजवाब! बाजरीची आंबिल, ज्वारीच्या घुगऱ्या, नाचणीची लापसी, राजगिऱ्याची कचोरी… तृणधान्याच्या खाद्यजत्रेबद्दल जाणून घ्या

वाहतुकीस अडथळा निर्माण होवू नये, डीजे आवाज मर्यादा, मंडप आकार अश्या काही बाबी बाबत दक्षता असते. अर्ज केल्यानंतर पालिका प्रशासन चमू अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांसह उत्सव स्थळाची पाहणी करते. योग्य वाटल्यास परवानगी मिळते. विजेसाठी विद्युत कंपनीकडे अर्ज करावा लागतो. रोषणाईसाठी महावितरण अल्पदरात मंडळास वीजपुरवठा देते. अशी परवानगी न घेता सार्वजनिक गणपती बसविण्यास मोठा दंड आकारला जातो. पालिका प्रशासक राजेश भगत यांनी सांगितले की, अद्याप परवानगी मागणारे अर्ज आलेले नाहीत. प्रामुख्याने उत्सवाच्या एक दोन दिवस आधी असे अर्ज येतात. सर्व ती तपासणी होते. नियम न पाळल्यास दंड आकारण्याची तरतूद आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Were these permissions taken before wlcoming public ganpati bappa pmd 64 ssb
Show comments