नागपूर : बुथ क्रमांक ३३ वर मशीनमध्ये सील नाही – काँग्रेसचा आक्षेप

पश्चिम नागपूर मतदारसंघात तिसऱ्या फेरी दरम्यान बुथ क्रमांक ३३ वर मशीनमध्ये सील नाही, असा आक्षेप काँग्रेसने घेतला आहे.

West Nagpur Constituency, seal machine, Booth No. 33,
नागपूर : बुथ क्रमांक ३३ वर मशीनमध्ये सील नाही – काँग्रेसचा आक्षेप (संग्रहित छायाचित्र)

नागपूर : पश्चिम नागपूर मतदारसंघात तिसऱ्या फेरी दरम्यान बुथ क्रमांक ३३ वर मशीनमध्ये सील नाही, असा आक्षेप काँग्रेसने घेतला आहे. काँग्रेसचे विकास ठाकरे पहिल्या तीन फेरीत भाजपचे सुधाकर कोहळे यांच्यापेक्षा मागे होते. पण, चौथ्या फेरीपासून ही तूट भरून काढत ३६१३ मतांनी पुढे झाले. पाचव्या फेरीत ठाकरे ४६५३ मतांनी समोर आहेत. तपासणीअंती काँग्रेसचा आक्षेप फेटाळला.

हेही वाचा – राज्यात भाजपचे विजयी मार्गक्रमण पण, नागपुरातील या मतदारसंघात मात्र विभाजनाची खेळी

हेही वाचा – यवतमाळ : महायुतीच मोठा भाऊ, महाविकास आघाडी दोन ठिकाणी खाते उघडणार?

मतदानाची टक्केवारी वाढण्यास अनेक घटक कारणीभूत असल्याचे दिसून येते. यामध्ये काँग्रेस, भाजप तसेच अपक्ष उमेदवाराकडून झालेला आक्रमक प्रचार हा एक आहे. त्याचा परिणाम मतदाराच्या टक्केवारीवरून दिसून आले आहे. शिवाय मुस्लीम समाजाच्या काही संघटनांनी महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला होता. परिणामी मुस्लीम महिलांनी मोठ्या संख्येने मतदान केले. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी मतदानाच्या दोन दिवसआधी नागपुरात ‘रोड-शो’ घेतला होता. यावेळी मुस्लीम महिला मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असल्याचे चित्र होते. अनुसूचित जातीचे २० ते २१ टक्के मतदार आहेत. हा समाज निवडणुकीबाबत सर्वांत जागृत समजला जातो. लोकसभा निवडणुकीत मतांचे विभाजन होऊ नये म्हणून तो काँग्रेसच्या बाजूने उभा राहिला होता. यावेळी देखील अशीच स्थिती असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: West nagpur constituency there is no seal in the machine at booth no 33 congress objected rbt 74 ssb

First published on: 23-11-2024 at 12:45 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या