अमरावती : पश्चिम विदर्भात वंचित बहुजन आघाडीला एकही जागा मिळू शकली नसली, तरी या पक्षाने उपद्रवमूल्‍य सिद्ध केले असून पश्चिम विदर्भातील नऊ जागांवर वंचित बहुजन आघाडीने महायुती आणि महाविकास आघाडीच्‍या मतांमधील फरकापेक्षा अधिक मिळवल्‍याने महाविकास आघाडीला नुकसान सहन करावे लागल्‍याचे चित्र आहे.

बुलढाणा, सिंदखेडराजा, जळगाव जामोद, खामगाव, अकोला पूर्व, अकोट, मुर्तिजापूर, कारंजा, राळेगाव या जागांवर महाविकास आघाडीच्‍या उमेदवारांना वंचित बहुजन आघाडीने थेट हादरा दिला.

Maharashtra Assembly Elections 2024 will opposition in maharashtra get Leader of opposition post
विरोधी पक्षनेतेपद विरोधकांना मिळू शकते का ?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Rahul Narwekar
Rahul Narwekar : संख्याबळ नाही तरीही मविआला विरोधी पक्षनेतेपद देणार का? राहुल नार्वेकरांनी स्पष्टच सांगितलं
Rahul narvekar
विरोधी पक्षनेतेपदासाठी अद्याप अर्जच नाही, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे स्पष्टीकरण
Jyotiraditya Scindia lady killer said Kalyan Banerjee
“सिंधिया लेडी किलर”, तृणमूलचे खासदार असं का म्हणाले? केंद्रीय मंत्र्याचंही जशास तसं प्रत्युत्तर
mamata banerjee latest marathi news
विश्लेषण : ‘इंडिया’ आघाडीचे नेतृत्व ममतांकडे? राज्यांतील पराभवानंतर काँग्रेसच्या स्थानाला धक्का…
Peoples representatives do not want helmets then why police insisting Jan Manch organization Question
लोकप्रतिनिधींना हेल्मेट नको, मग पोलिसांचाच आग्रह का? जनमंचचे राजीव जगताप म्हणतात, ‘पायी चालणाऱ्यांनाही…’
Rahul Narvekar
Rahul Narvekar : शिवसेना, राष्ट्रवादी व्हाया भाजपा, सर्वात कमी वयाचे विधानसभाध्यक्ष; राहुल नार्वेकरांची राजकीय कारकीर्द कशी आहे?

हेही वाचा – गडचिरोलीत एक दशकानंतर काँग्रेसला संधी, आरमोरीची जागा गमावल्याने भाजपला धक्का

बुलढाणा मतदारसंघात शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे संजय गायकवाड हे अवघ्‍या ८४१ मतांनी निवडून आले. शिवसेनेच्‍या (उद्धव ठाकरे) जयश्री शेळके यांनी कडवी झुंज दिली. पण, वंचित बहुजन आघाडीच्‍या उमेदवाराने ७ हजार १४६ मते घेत जयश्री शेळके यांच्‍या पराभवाला हातभार लावला. सिंदखेडराजा मतदारसंघात राष्‍ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) मनोज कायंदे यांनी राष्‍ट्रवादीचे (शरद पवार) डॉ. राजेंद्र शिंगणे यांना ४ हजार ६५० मतांनी पराभवाची धूळ चारली. त्‍याचवेळी वंचित बहुजन आघाडीने १६ हजार ६५८ मते खेचून शरद पवार गटाला अपशकून केला.

खामगावमध्‍ये काँग्रेसचे राणा दिलीपकुमार सानंदा हे २५ हजार मतांनी पराभूत झाले. वंचित बहुजन आघाडीने तब्‍बल २६ हजार ४८२ मते घेतली. या ठिकाणी भाजपला पुन्‍हा एकदा संधी मिळाली. जळगाव जामोदमध्‍ये भाजपला १८ हजार ७७१ इतके मताधिक्‍य मिळाले खरे, पण काँग्रेसच्‍या पराभवासाठी वंचित बहुजन आघाडीच्‍या १७ हजार ६४८ आणि महाराष्‍ट्र स्‍वराज्‍य पार्टीच्‍या ९ हजार ९८३ मतांचा हातभार लागला. मुर्तिजापूरमध्‍ये भाजपने राष्‍ट्रवादी काँग्रेसचा (शरद पवार) ३५ हजार ८६४ मतांनी पराभव केला. त्‍यात वंचित बहुजन आघाडीने मिळवलेली तब्‍बल ४९ हजार ६०८ मते शरद पवार गटासाठी नुकसानदायक ठरली.

हेही वाचा – ‘लाडकी बहीण’ प्रभाव या मतदारसंघात का चालला नाही ?

अकोटमध्‍ये भाजपने काँग्रेसला १८ हजार ८५१ मतांनी पराभवाचा हादरा दिला. त्‍यात वंचित बहुजन आघाडीने तब्‍बल ३४ हजार १३५ मते मिळवून उपद्रवमूल्‍य दर्शविले. अकोला पूर्वमध्‍ये भाजपला ५० हजार ६१३ इतके मताधिक्‍य मिळाले खरे, पण वंचित बहुजन आघाडीने तब्‍बल ५० हजार ६८१ मते घेतली. या ठिकाणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नुकसान झाले. कारंजामध्‍ये भाजपला ३५ हजार ७३ इतके मताधिक्‍य मिळाले. राष्‍ट्रवादी काँग्रेसचा (शरद पवार) पराभव झाला. या पराभवात एमआयएमने ३१ हजार ४२ आणि वंचित बहुजन आघाडीने मिळवलेली २४ हजार ४४२ मते कारणीभूत ठरली.

राळेगावात वंचित बहुजन आघाडीच्‍या उमेदवाराने २ हजार ९३८ मते घेतली. यावेळी काँग्रेसचे वसंत पुरके यांना २ हजार ८१२ मतांनी पराभव पत्‍करावा लागला. याशिवाय धामणगाव रेल्‍वे, पुसद आणि इतर काही ठिकाणी वंचित बहुजन आघाडीमुळे महाविकास आघाडीला नुकसान सहन करावे लागले आहे.

Story img Loader