अमरावती: यंदा डिसेंबरच्या मध्यावर पश्चिम विदर्भातील लहान-मोठ्या धरणांमध्ये २ हजार २७५ दशलक्ष घनमीटर अर्थात ७३.९८ टक्के जलसाठा शिल्लक असून गेल्यावर्षीच्या तुलनेत हे प्रमाण १४ टक्क्यांनी कमी आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
यंदा काही भागात पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने अनेक सिंचन प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले नव्हते. काही प्रकल्प मात्र तुडुंब भरले. सप्टेंबरअखेर विभागातील सर्व प्रकल्पांमध्ये ८१.७१ टक्के जलसाठा झाला होता. मध्यंतरीच्या काळात पिण्यासाठी आणि सिंचनासाठी पाणी वापरात असल्याने धरणातील पाणीसाठा हा हळूहळू कमी होत आहे. अमरावती शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वर्धा धरणात ४८२.८५ दलघमी म्हणजे ८५.६० टक्के पाणीसाठा असून अमरावतीकरांना पाणीटंचाईची भीती बाळगण्याची गरज नाही, असे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत अप्पर वर्धा धरणात ८५.९० टक्के पाणीसाठा होता. यंदा सप्टेंबर अखेर अप्पर वर्धा पूर्ण क्षमतेने भरले होते.
हेही वाचा… बुलढाणा: चोरट्यांचा मध्यरात्री धुडगूस, वाघजाळ गावात तिघांना मारहाण; लाखाचा ऐवज लुटला
अमरावती विभागातील एकूण ९ मोठ्या प्रकल्पांची संकल्पित पाणीसाठा हा १३९९ दलघमी इतका असून सध्या १०१७ दलघमी अर्थात ७२.६८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. २७ मध्यम प्रकल्पांचा संकल्पित पाणीसाठा ७७१ दलघमी आहे. सध्या ५८४ दलघमी म्हणजे ७५.८२ टक्के पाणीसाठा आहे. लघु प्रकल्पांमध्ये यंदा मात्र समाधानकारक जलसाठा होऊ शकलेला नाही. सध्या २४६ लघु प्रकल्पांमध्ये ६७३ दलघमी म्हणजे ७४ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. उन्हाळा संपेपर्यंत सिंचनासाठी यंदा जपून पाणी वापर करावा लागणार आहे.
हेही वाचा… बदलीसाठी महिला कर्मचाऱ्याकडे शरीरसुखाची मागणी, अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
पर्जन्यमान कमी राहिल्याने धरणांमध्ये आधीच कमी जलसाठा असताना सिंचनासाठी आणि औद्योगिक वापरासाठी पाण्याची मागणी वाढली आहे. अपुऱ्या पावसामुळे अनेक तालुक्यांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य होते. हिवाळ्यातच पाणीटंचाईचे सावट आहे. डिसेंबरच्या मध्यावर धरणांमध्ये ७३ टक्के पाणीसाठा आहे. विभागातील प्रमुख शहरे ही पिण्याच्या पाण्यासाठी धरणांवरच विसंबून आहेत. त्यामुळे पाण्याचे काटेकोर नियोजन करावे लागणार आहे.