लोकसत्ता टीम
नागपूर: अरबी समुद्रातील ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ १२५ ते १३५ किलोमीटर प्रती तास वेगाने गुजरात ते पाकिस्तान दरम्यानच्या किनारपट्टीवर १५ जूनला धडकण्याची शक्यता आहे. तसेच चक्रीवादळ जमिनीवर आल्यानंतर त्याची तीव्रता कमी होऊन कमी दाबाच्या पट्टय़ात रूपांतर होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या सर्व शक्यता लक्षात घेऊन आणि संभावित धोका टाळण्यासाठी पश्चिम रेल्वेने १४,१५, १६ आणि १७ जूनला काही गाड्या रद्द केल्या आहेत. तर काही गाड्यांना गंतव्य स्थानकापूर्वीच थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.
पोरबंदर ते शालीमार एक्सप्रेस १४ व १५ जूनला रद्द करण्यात आली आहे. तर १२९०६ शालीमार ते पोरबंदर एक्सप्रेस ही गाडी १६ व १७ जूनला रद्द करण्यात आली आहे. १२९५० संतरागाथी ते पोरबंदर एक्सप्रेस ११ जूनला केवळ अहमदाबादपर्यंत धावणार आहे. तर २२९०६ शालीमार-ओखा एक्सप्रेस १३ जूनला केवळ सुंदरनगर पर्यंत जाणार आहे. २२८२९ भुज-शालीमार एक्सप्रेस १३ जूनला अहमदाबाद येथून सुटणार आहे. तर १२९४० पोरबंद संतरागाछी एक्सप्रेस १६ जूनला अहमदाबाद येथून सोडण्यात येणार असल्याचे रेल्वेने कळविले आहे.