नागपूर : हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणावर विधान परिषदेत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान “पीएचडी करून ही पोरं काय दिवे लावणार आहेत?”, असे वादग्रस्त विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठली. विधान परिषदेतील या वक्तव्यामुळे अजित पवार समाजमाध्यमांवर ट्रोल होऊ लागले. पीएचडी करणारे विद्यार्थी अजित पवारांविरोधात नाराजी व्यक्त करत आहेत, तर काहींनी अजित पावारांच्या या वक्तव्याचा निषेध नोंदवला आहे. विरोधकांनीही अजित पवारांवर यावरून निशाणा साधला. हा वाद वाढतच चालल्याचे पाहून उपमुख्यमंत्री पवार यांनी आज आपल्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त केली.

नेमकं काय म्हणाले होते अजित पवार?

राज्यात मराठा आरक्षणाचा विषय चांगलाच तापला आहे. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनातही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. अशातच सारथीसारख्या संस्थेच्या माध्यमातून मराठा विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सुविधा कशा पुरवता येतील यावर विधान परिषदेत चर्चा झाली. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील विधान परिषदेत म्हणाले, “सारथीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पीएचडी करण्यासाठी फेलोशिप दिली जाते. परंतु केवळ २०० विद्यार्थ्यांनाच ही शिष्यवृत्ती दिली जाईल, असा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. ही संख्या वाढवण्यात यावी. सतेज पाटील यांची मागणी ऐकताच उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “पीएचडी करून ही पोरं काय दिवे लावणार आहेत?” अजित पवारांच्या या धक्कादायक वक्तव्याचं सतेज पाटलांसह अनेकांना आश्चर्य वाटलं.

Success Story Of Aditya Srivastava In Marathi
Success Story Of Aditya Srivastava: स्वप्ने सत्यात उतरतात! लाखोंची नोकरी सोडून यूपीएससी परीक्षेत आला पहिला, वाचा अनेकांची प्रेरणा ठरणाऱ्या आदित्य श्रीवास्तवचा प्रवास
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
expert answer on career advice questions career advice tips from expert
करीअर मंत्र
Anshula Kapoor talks about parents Boney Kapoor Mona Kapoor divorce
“माझे आई-वडील वेगळे झाल्यावर…”, पालकांच्या घटस्फोटाबाबत पहिल्यांदाच बोलली जान्हवी कपूरची सावत्र बहीण
education opportunities admission to master of science programs at radiation medicine centre barc
शिक्षणाची संधी : बीएआरसीमध्ये ‘मास्टर ऑफ सायन्स प्रोग्राम’
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “त्यांनी मला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला, पण…”, चांदीवालांच्या गौप्यस्फोटावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
nehru literature soon in one click available on digital form on mobile
नेहरूंचे साहित्य लवकरच एका क्लिकवर!

हेही वाचा – “निवडणूक आयोग केंद्र सरकारच्या दबावात”, काँगेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांची टीका; म्हणाले, “उच्च न्यायालयाने…”

माझ्या वक्तव्याचा विपर्यास

आज, गुरुवारी विधान भवन परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अजित पवार यांनी आपल्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त केली. पीएचडीबाबत मी जे बोललो त्याचा विपर्यास करण्यात आला. मी त्याबाबत दिलगिरी व्यक्त करतो. मात्र, काही संशोधक नेत्यांवर पीएचडी करताहेत, असे होऊ नये. पीएचडी करताना विषयाचे गांभीर्य असायला हवे, असेही अजित पवार म्हणाले.

जुन्या पेन्शनबाबत महत्त्वाचे विधान

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जुन्या पेन्शनबाबतही महत्त्वाचे विधान केले आहे. जुन्या पेन्शनसंदर्भात कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत काल बैठक झाली. त्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुख्य सचिव होते. मुख्यमंत्र्यांनी जुनी पेन्शनबाबत सकारात्मकता दर्शविली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. सहाय समितीचा अहवाल आला आहे. या अहवालाचे सरकारने वाचन केलेले नाही. त्यानंतर अहवाल पटलावर ठेवण्यात येईल. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समिती कर्मचारी संघटनांशी चर्चा करतील. केंद्र सरकारनेदेखील एक अभ्यास समिती गठीत केली आहे. पण, त्यांच्याशी आम्ही लिंकअप करणार नाही. आपल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळावी, यासाठी सरकार निश्चितपणे सकारात्मक निर्णय घेईल. २०३१-३२ पासून जुनी पेन्शनची अंमलबजावणी होणार आहे. त्यांचे काही मुख्यमंत्र्यांनी निकाली काढले. कर्मचाऱ्यांचा आग्रह आहे की सरकारने तत्काळ निर्णय घ्यावा. मात्र, आम्ही संप मागे घेण्याचे आवाहन केले असून चर्चेतून यावर तोडगा निघेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

हेही वाचा – अकोला महापालिकेकडून राज्याच्या विरोधी पक्षनेत्यांची दिशाभूल? ‘स्वाती’ प्रकरणातील अनियमिततेचे प्रश्न अनुत्तरीत

कांदा, इथेनॉलप्रश्नी अमित शहांना भेटणार

दूध, कांदा आणि इथेनॉल प्रश्नावर आम्ही काल सहकारमंत्री अमित शहा यांच्यासोबत बोललो. दुधाचे पावडर निर्यात करण्याचा निर्णय झाल्यास त्याचा देशभरातील दूध उत्पादकांना मदत होईल, असे सांगितले. तर कांदा आणि इथेनॉलबाबत १६ ला आम्ही भेट घेणार आहोत, असे अजित पवार म्हणाले.

भुजबळांचा गैरसमज दूर करणार

महाज्योतीला सारथीच्या तुलनेत कमी अनुदान मिळाल्याचा आरोप अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले, ‘कालच्या पुरवणी मागण्यांमध्ये सारथी, बार्टी, महाज्योती यांना मोठी तरतूद केली आहे. ती मंजूर पण झाली आहे. राज्यकर्ते कुणीही असले तरी असा भेदभाव करता येत नाही. भुजबळांना काही गैरसमज झाला असल्यास त्यांच्याशी बोलून तो दूर करण्यात येईल, असे अजित पवार म्हणाले.