अकोला : आगामी काळात उन्हाळ्याच्या सुट्या, लग्नसराई व सणासुदीच्या काळामुळे रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळण्याची शक्यता आहे. अतिरिक्त गर्दीच्या काळात प्रवाशांना दिलासा मिळण्यासाठी रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला. विशेष गाड्या चालवण्यात येणार आहे. या विशेष गाड्यांमुळे प्रवाशांना अधिक सोयीस्कर आणि आरामदायी प्रवास करता येईल. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गाडी क्रमांक ०९५७५ राजकोट – महबूबनगर साप्ताहिक विशेष गाडी ३० जूनपर्यंत प्रत्येक सोमवारी राजकोट येथून १३.४५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी २०.०० वाजता महबूबनगर येथे पोहोचेल. गाडी क्रमांक ०९५७६ प्रत्येक मंगळवारी १ जुलैपर्यंत महबूबनगर येथून २२.१० वाजता सुटून तिसऱ्या दिवशी ५.०० वाजता राजकोट येथे पोहोचेल. या गाडीला वांकानेर, सुरेंद्रनगर, अहमदाबाद, नडीयाद, आणंद, वडोदरा, उधना, नंदुरबार, जळगाव, भुसावळ, मलकापूर, अकोला, वाशीम, हिंगोली, बसमत, पूर्णा, नांदेड, धर्माबाद, बासर, निजामाबाद, कामारेड्डी, मेडचल, काचीगुडा, उमदानगर, शादनगर आणि जडचर्ला येथे थांबा राहील. याशिवाय गाडी क्रमांक ०९०२५ / ०९०२६ वलसाड – दानापूर साप्ताहिक विशेष गाडी, गाडी क्रमांक ०९०४५ / ०९०४६ उधना – पटना साप्ताहिक विशेष गाडी, गाडी क्रमांक ०९१२९ / ०९१३०  बांद्रा टर्मिनस – रेवा अनारक्षित विशेष गाडी धावणार असल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

मध्य रेल्वे मार्गावर विशेष वाहतूक व ‘पॉवर ब्लॉक’

मध्य रेल्वे मार्गावर विशेष वाहतूक व पॉवर ब्लॉक घेतला जाणार आहे. जळगाव – भादली रेल्वे स्थानकांदरम्यान (इगतपुरी – भुसावळ विभाग) कि.मी. ४२३/१७-१९ येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील तरसोद – फागणे चौपदरी उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी ५८ मीटर गर्डर लावण्याच्या करण्यासाठी विशेष वाहतूक आणि ‘पॉवर ब्लॉक’ घेतला जात आहे. हा उड्डाणपूल तरसोद – फागणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ च्या चौपदरीकरण प्रकल्पांतर्गत (कि.मी. ४२२.७०० ते कि.मी. ५१०.००) अंतर्गत बांधला जात आहे. यासाठी मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात ‘अप व डाऊन’ मार्गावर तसेच तिसरी व चौथी लाईन यावर विशेष वाहतूक व पॉवर ब्लॉक घेतला जात आहे. या ‘ब्लॉक’मुळे विविध गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम होत आहे. ९ मार्चपर्यंत विविध रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकामध्ये बदल होणार असून काही गाड्या उशिराने धावणार आहेत. मध्य रेल्वे मार्गावर विशेष वाहतूक व ‘पॉवर ब्लॉक’मुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.