नागपूर : जन्माष्टमीचा सण नुकताच साजरा झाला असून लवकरच गणेशोत्सवासह इतरही सण येणार आहेत. त्यातच ११ सप्टेंबरला (सोमवारी) नागपुरात सोन्याचा दर घसरून प्रति दहा ग्राम ५९ हजार ४०० रुपये नोंदवला गेला.
नागपूर सराफा बाजारातील दरानुसार ११ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी १०.३२ वाजता नागपुरात २४ कॅरेटसाठी ५९ हजार ४०० रुपये, २२ कॅरेटचा दर ५६ हजार ४०० रुपये, १८ कॅरेटचा दर ४७ हजार ५०० रुपये, १४ कॅरेटचा दर ३८ हजार ६०० रुपये नोंदवले गेले. तर चांदीचा दर प्रति किलो ७२ हजार रुपये होता.
हेही वाचा – पर्जन्यमान : कसा असेल पावसाळी वातावरणाचा मुक्काम? जाणून घ्या…
हेही वाचा – दहा लाखांवर विद्यार्थी शिक्षणासाठी विदेशात, ‘या’ पाच देशांना सर्वाधिक पसंती
दरम्यान नागपुरात ४ सप्टेंबरला २४ कॅरेटसाठी सोन्याचे दर प्रति १० ग्राम ५९ हजार ९०० रुपये, २२ कॅरेटचा दर ५६ हजार ९०० रुपये, १८ कॅरेटचा दर ४७ हजार ९०० रुपये, १४ कॅरेटचा दर ३८ हजार ९०० रुपये सोन्याचे दर होते. तर चांदीचा दर प्रति किलो ७४ हजार ७०० रुपये होता. सध्या दर कमी असले तरी लवकरच हे दर वाढण्याचे संकेत रोकडे ज्वेलर्सचे राजेश रोकडे यांनी वर्तवले.