नागपूर– न्या.  संदीप शिंदे (निवृत्त)  समितीच्या सुचनेप्रमाणे पुढील चार दिवसात कुणबी-मराठा, मराठा-कुणबी जात नोंदी शोधण्याची मोहीम पूर्ण करा, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी दिले.जिल्ह्यात मंगळवारपासून या कामाला सुरुवात झाली.जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी मंगळवारी आढावा बैठक घेतली. कालमर्यादेत काम पूर्ण करावे, असे निर्देश दिले.अधिका-यांनी खासरा पत्रक,  कुळ नोंदवही,  शैक्षणिक अभिलेखे, जन्म मृत्यू नोंदी, करार खत, भाडेचिठ्ठी, मृत्यूपत्र, माजी सैनिकांच्या नोंदी, सेवापुस्तक, सेवा अभिलेख, सैन्य भरतीच्या वेळी घेतलेल्या नोंदी आदींची तपासणी करावी,अशा सूचना देण्यात आल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मराठा – कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये वंशावळी, निजामकालीन पुरावे, शैक्षणिक पुरावे, महसुली पुरावे तपासण्याची मोहीम राज्यभर सुरू आहे. तपासणीअंती पात्र व्यक्तींना मराठा – कुणबी, कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी निवृत्त न्यायमुर्तींच्या अध्यक्षतेखाली स्थापन समितीच्या निर्देशावरून हे काम सुरू आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What are the orders of the district collector to check kunbi records in nagpur cwb 76 amy