अकोला : खासगी रुग्णालयातील मृत्यूशय्येवरील रुग्ण शासकीय रुग्णालयात पाठवले जातात. संभाजीनगर, नागपूरसारख्या शहरांमध्ये सरासरी होणाऱ्या मृत्यूंनाच मोठ्या प्रमाणात मृत्यू होत असल्याचा आभास निर्माण केला जात आहे. हा प्रकार अहोरात्र झटणाऱ्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर अविश्वास दाखवण्यासारखा आहे. काही लोकांकडून राजकीय स्वार्थापोटी आरोग्य यंत्रणा कोलमडल्याचे चित्र निर्माण केले जाते, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केला.

अकोल्यात महाआरोग्य शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. पुढे ते म्हणाले, नांदेड येथे गंभीर घटना घडली. त्याला कमी लेखले जाऊ शकत नाही. वास्तव समजून घेण्याची गरज आहे. खासगी रुग्णालयातील मृत्यूशय्येतील रुग्ण सर्रास शासकीय रुग्णालयांमध्ये पाठवले जातात. शासकीय रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना कधीच नाकारले जात नाही. शासकीय रुग्णालयातील मृत्यूमधील बहुतांश रुग्ण खासगी रुग्णालयातून आलेलेच असतात. ही परिस्थिती दिसून आली. आरोग्य व्यवस्था सुधारण्याची गरज आहेच. मात्र, शासकीय रुग्णालयात अहोरात्र कार्यरत डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर आरोप करणे अयोग्य आहे. काही कमतरता असल्यास ती दूर केली जाईल.

Ajit Pawar claimed area honorables deprived Kharadi Chandannagar of water for tanker business
अन्यथा मते मागायला येणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार का म्हणाले !
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Video Story Of Ravindra Dhangekar And Devendra Fadnavis.
Ravindra Dhangekar: “निवडणूक हरत असल्याचे लक्षात येताच…” फडणवीसांच्या ‘ॲक्सिडेंटल आमदार’ टीकेला धंगेकरांचे प्रत्युत्तर; पाहा व्हिडिओ
nana patole replied to devendra fadnavis
“आरएसएससुद्धा धार्मिक संघटना, मग त्यांनी…”; देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला नाना पटोले यांचे प्रत्युत्तर!
Singh said Modi treated Maharashtra like step mother running 2 lakh crore projects in Gujarat
“पंतप्रधान मोदी यांची महाराष्ट्राला सावत्र वागणूक,” संजय सिंह यांचा आरोप
dcm devendra fadnavis in loksatta loksamvad
लोकसभेतील अपयशानंतर ‘भारत जोडो’सारख्या शक्तींवर मात; विधानसभेत प्रभाव नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
Donald trump, Elon Musk, Vivek Ramaswamy, Minimum Government, Maximum Governance
विश्लेषण : इलॉन मस्क, विवेक रामस्वामी ‘सरकार कार्यक्षमता’ मंत्री… ‘टीम ट्रम्प’ आतापासूनच का भरवतेय धडकी?

हेही वाचा – पेपरफुटीचे सत्र सुरूच; देवेंद्र फडणवीस मंत्री असलेल्या विभागाचाच पेपर फुटला…

आरोग्य यंत्रणेसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जात आहे. एक जरी मृत्यू झाला तर तो काळजीचा आहे. मृत्यू आपण थांबवू शकत नाही. रुग्णाला योग्य उपचार व औषध मिळाले की नाही, हे पाहणे आवश्यक आहे. ३० टक्के औषधांची खरेदी स्थानिक पातळीवरून केली जाते. प्रामुख्याने लागणारे औषधे सर्वच रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहेत. आगामी काळात अग्रीम स्वरुपात औषधे खरेदी करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हेही वाचा – नागपूरकर ओजस देवतळेची ‘सुवर्ण’ कामगिरी; आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजी या प्रकारात सलग तिसरे सुवर्णपदक

महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणा कोलमडल्याचे चित्र काही लोक राजकीय स्वार्थासाठी तयार करीत आहेत. शासकीय डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना बदनाम करण्याचे काम त्यांनी करू नये, असेदेखील फडणवीस यांनी नमूद केले.