बुलढाणा : मी सध्या बुलढाणा जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने विकास योजनांचा आढावा घेत आहे. यामुळे राज्यात काही सुरू आहे, याची मला फारशी कल्पना नाही. यामुळे मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील शाब्दिक संघर्षावर मी काहीच बोलणार नाही. तुम्ही मला वादग्रस्त विषयांमध्ये ओढूच नका, अशी प्रतिक्रिया राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी येथे दिली.

बुलढाण्याचे पालकमंत्री वळसे पाटील दोन दिवसांच्या जिल्हा दौऱ्यावर आहेत. आज त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक आहे. या व्यस्ततेत माध्यमाशी बोलताना त्यांनी मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष, मंत्री छगन भुजबळ विरुद्ध मनोज जरांगे पाटील शाब्दिक संघर्ष, या वादग्रस्त विषयांवर बोलण्यास स्पष्ट नकार दिला. मी दोन दिवसांपासून आढावा बैठकांत व्यस्त आहे. त्यामुळे या घडामोडींबद्दल अनभिज्ञ आहे आणि तसेही तुम्ही मला या वादग्रस्त विषयांमध्ये ओढूच नका, असे त्यांनी सांगितले.

Ajit Pawar And Amol Mitkari.
Ajit Pawar : “…तर सरकारलाही अर्थ नाही”, अजित पवार आणि अर्थ खात्यावरून अमोल मिटकरींचा महायुतीलाच टोला
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Sadhguru disheartened over Parliament disruptions on adani issue
Sadhguru on Adani: ‘उद्योगपतींवरून संसदेत रणकंदन नको’, अदाणींना समर्थन देत सद्गुरुंनी व्यक्त केली नाराजी
Ujjwal Nikam.
Ujjwal Nikam On EVM : “आज तुम्ही पराभूत झाल्यामुळे…” उज्ज्वल निकमांनी सांगितले ईव्हीएम विरोधात न्यायालयीन लढ्यासाठी कोणत्या दहा गोष्टी लागणार
Image of Vice-President Jagdeep Dhankhar or Rajya Sabha proceedings
No Confidence Motion : भारताच्या संसदीय इतिहासातील सर्वात मोठी घटना, राज्यसभा सभापतींच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव
Rahul Narwekar
विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळणार का? अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केली भूमिका
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!
ajit pawar rahul narvekar
Video: “जे आहे ते आहे, लाडक्या बहिणीनेच आम्हाला…”, अजित पवारांची विधानसभेत स्पष्टोक्ती!

हेही वाचा – वर्धा : उद्योग मंत्री उदय सामंत म्हणतात, विनाउद्योग भूखंड परत घ्यावे

धनगर समाजाच्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहोचविणार

जिल्ह्यातील धनगर समाजाच्या शिष्टमंडळाने आपली भेट घेऊन चर्चा केली. त्यांच्या भावना आपण मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासह कोअर समितीपर्यंत पोहोचवणार आहे. बुलढाणा जिल्हा सहकारी बँकेला ३०५ कोटींचे ‘सॉफ्ट लोन’ देण्यास राज्य बँकेने तत्वतः मान्यता दिली आहे. आमदार राजेंद्र शिंगणे यासाठी प्रयत्नशील आहेत. मीदेखील यात लक्ष घातले असून सरकार व राज्य सहकारी बँकेच्या संपर्कात असल्याची माहितीही पालकमंत्र्यांनी दिली.

हेही वाचा – चंद्रपूर : बल्लारपूरमध्ये मैदानी खेळ व बॉक्सिंगसाठी व्हावी क्रीडा प्रबोधिनी, मुनगंटीवार यांची क्रीडा मंत्री यांना पत्राद्वारे मागणी

आढावा बैठकीत दुष्काळी स्थिती, पाणी टंचाई यावर चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकारी, एसडीओ, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या. चारा वैरण याची टंचाई भासणार नाही याची दक्षता घेण्याचे व तसे नियोजन करण्याचे निर्देश त्यांना दिले आहे.

Story img Loader