बुलढाणा : मलकापूर विधानसभा मतदारसंघाच्या सन २०१९ च्या निवडणुकीत ‘काही जवळच्या लोकांनीच अडचणी निर्माण केल्या’. यामुळे दीर्घ राजकीय कारकिर्दीत प्रथमच पराभव स्वीकारावा लागला, असा खळबळजनक गौप्यस्फोट भाजपचे ज्येष्ठ नेते, मलकापूरचे माजी आमदार चैनसुख संचेती यांनी केला आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ महायुतीच्या विजयात निर्णायक घटक (ट्रम्प कार्ड) ठरेल असा दावाही या ज्येष्ठ नेत्याने केला आहे.

मलकापूर मतदारसंघाचे दीर्घकाळ आमदार असलेले चैनसुख संचेती यांनी मंगळवारी, २० ऑगस्ट रोजी संध्याकाळी स्थानीय जिल्हा पत्रकार भवन येथे प्रसिद्धीमाध्यम प्रतिनिधीसोबत संवाद साधला. यावेळी संचेती यांनी, सुमारे पाच वर्षांनंतर मागील निकालावर भाष्य करताना वरील गौप्यस्फोट केला. मलकापूर मतदारसंघातून यंदाही लढणार काय ? अशी विचारणा केली असता त्यांनी होकार देताना सावध प्रतिक्रिया दिली. यावेळी चैनसुख संचेती यांनी सांगितले की, मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत घडलो असून भाजपचा शिस्तबद्ध कार्यकर्ता आहे. यामुळे पक्षश्रेष्ठींनी आदेश दिला तर मलकापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचे ते म्हणाले. मी लढण्यासाठी तयार किंबहुना सज्ज असल्याचे माजी आमदार संचेती यांनी स्पष्ट केले. पक्षाचा कोणताही आदेश पाळण्यास आपण सदैव तत्पर असल्याची पुस्ती त्यांनी जोडली.

Arjuni Morgaon Constituency , Ajit Pawar, Manohar Chandrikapure,
विदर्भात अजित पवारांची भाजपकडून कोंडी
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Bhosari Constituency, Mahesh Landge, Ajit Gavhane,
भोसरीत दुरंगी; पण तुल्यबळ लढत
Pankaja Munde At Rally In Parali Beed.
“डोळ्यांसमोर कमळ येईल, पण तुम्ही घड्याळाचेच बटन दाबा…” धनंजय मुंडेंच्या समोरच काय म्हणाल्या पंकजा? पाहा व्हिडिओ
Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
batenge to katenge bjp vs congress
भाजपच्या ‘बटेंगे’ला काँग्रेसचे ‘जुडेंगे’
Kamathi Vidhan Sabha Constituency President Chandrasekhar Bawankule Nominated
लक्षवेधी लढत: कामठी : भाजपच्या प्रदेशाध्यक्षांसाठी प्रतिष्ठेची लढत
Chhagan Bhujbal statement that he is involved in power for development
ईडीमुळे नव्हे, तर विकासासाठी सत्तेत सहभागी; छगन भुजबळ यांची सारवासारव

हेही वाचा – VIDEO : ‘खैके पान बनारस वाला’ गाण्यावर डान्स अन् निलंबनाची कुऱ्हाड; नागपुरातील ते चार पोलीस…

मलकापूर विधानसभा मतदारसंघाच्या मागील (सन २०१९ च्या) निवडणुकीतील पराभवावर विचारणा केली असता, या ज्येष्ठ नेत्याने खळबळजनक गौप्यस्फोट करीत आपल्या मनातील खदखद वा शल्य बोलून दाखविले. मागील लढतीत ‘जवळच्या लोकांनी’ अनपेक्षितरित्या निर्णायक क्षणी अडचणी निर्माण केल्या. यामुळे दीर्घ राजकीय कारकिर्दीत प्रथमच पराभव स्वीकारावा लागला. मात्र त्या वेळी कळत नकळत झालेल्या चुकांपासून म्हणा किंबहुना जवळच्या लोकांनी निर्माण केलेल्या अडचणीपासून धडा घेतला आहे. आम्ही त्यावर चिंतन मनन केले असून कमी मतदान झालेल्या मतदानाचा अभ्यास केला आहे. आता अश्या ‘अडचणी’ येणार नाही अशी दक्षता घेणार असल्याचे या ज्येष्ठ नेत्याने स्पष्ट केले.

‘योजना नव्हे ब्रम्हास्त्र’

महाराष्ट्र राज्याला चौफेर विकास आणि प्रगतीकडे नेणाऱ्या महायुती सरकारने नुकतीच जाहीर केलेली ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना विधानसभा निवडणुकीत ब्रम्हास्त्र ठरणार असल्याचा दावा यावेळी संचेती यांनी बोलून दाखविला. या योजनेच्या अंमलबजावणीकरिता गठीत मलकापूर विधानसभा मतदारसंघाच्या समितीचा अध्यक्ष या नात्याने मी हे दाव्यानिशी सांगू शकतो. मलकापूर मतदारसंघात या योजनेला माता भगिनींचा मिळालेला आणि मिळत असलेला प्रतिसाद उत्साही आहे. यामुळे यंदाचा रक्षाबंधन सण खऱ्या अर्थाने लोकोत्सव ठरला आहे. भगिनी आम्हाला ओवळीत आहे, राख्या बांधून स्वागत करीत आहे. भाऊंच्या विजयासाठी प्रार्थना करीत असल्याचे चित्र असल्याचे माजी आमदार संचेती यावेळी म्हणाले.

मलकापूर अर्बनला लवकरच परवाना

दरम्यान मलकापूर अर्बन बँकेला लवकरच परवाना मिळेल असा दावा संचेती यांनी केला. रिझर्व्ह बँकेने बँकेवर कलम ३५ अ प्रमाणे बंधने घातली आहे. या विरोधात आम्ही सक्षम प्राधिकरणाकडे ‘अपील’ केले आहे. बँकेला ६७३.५९ कोटी रुपये देणे आहे. त्या तुलनेत बँकेकडे असणारी शिल्लक (सरप्लस) रक्कम ७०३.५८ कोटी रुपये इतकी आहे. यामुळे देणे चुकविण्यात फारशी अडचण जाणार नाही. पुन्हा परवाना मिळाला तर येत्या काही महिण्यातच बँकेची स्थिती सुरळीत होईल, असे संचेती म्हणाले.

हेही वाचा – सावधान! मंकीपॉक्स झपाट्याने पसरतोय… नागपुरातील ‘या’ रुग्णालयांत उपचाराची व्यवस्था

तो पराभव जिव्हारी

दरम्यान मागील लढतीत नवख्या उमेदवाराकडून झालेला दारुण पराभव संचेती यांच्या जिव्हारी लागला होता. नांदुरा नगर परिषदपुरते मर्यादित असलेले राजेश एकडे (काँग्रेस) यांनी मावळते आमदार चैनसुख संचेती (भाजप) यांचा तब्बल १४ हजार ८३४ मतांनी एकतर्फी पराभव केला होता. यामुळे ते राजकारणात माघारले अन त्यांची लाल दिव्याची संभाव्य संधीही हुकली. आज सुमारे पावणेपाच वर्षांनंतरही ही सल कायम असल्याचे यावेळी दिसून आले. या संवादातही त्यांनी ही खदखद बोलून दाखविली. मलकापूरमधून सन १९९५ मध्ये अपक्ष म्हणून निवडून आल्यावर त्यांनी पाच टर्म विजय मिळवीत कधीच मागे वळून पाहिले नाही. सन १९९९ पासून पुढील २००४, २००९ आणि २०१४ च्या लढती भाजपतर्फे लढत त्यांनी सलग पाचदा विजय मिळविला.