वर्धा : वर्धा मतदारसंघ काँग्रेकडून निसटला, तो राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेला, असे वातावरण आहे. मात्र, नवाच संशयकल्लोळ झाला. आज शरद पवार यांनी घेतलेल्या बैठकीत माजी आमदार राजू तिमांडे तसेच समीर सुरेश देशमुख यांनी हजेरी लावली. त्यात पवारांचे प्रश्न आणि इच्छुकांचे उत्तर असेच स्वरूप राहले.

सामाजिक समस्यांवार खदखद व्यक्त करणारे नीलेश कराळे यांनीही लढण्याची तयारी दर्शविली. पैसे पण जुळवितो, तिकीट द्या, असे त्यांनी म्हटल्याचे वृत्त आहे. त्यांचा मोबाईल बंद असल्याने त्यांची प्रतिक्रिया मिळाली नाही. तर टॉपचे संभाव्य उमेदवार हर्षवर्धन देशमुख यांनी जुनेच दुखणे सांगितल्याचे माहिती आहे. लढतो पण पैश्यांची अडचण आहे. तेवढे बघा, असे ते म्हणाल्याचे समजले.

हेही वाचा – माढ्यात मोहिते-पाटील शांत; मात्र समर्थक आक्रमक; ‘तुतारी’ वाजू लागली

हेही वाचा – भाजपमध्ये उमेदवारीवरून सुरू झालेले नाराजीनाट्य चार दिवसांत संपेल, गिरीश महाजन यांचा दावा

इंडिया आघाडीचे निमंत्रक अविनाश काकडे म्हणाले की, भेट झाली हे खरे आहे. अधिक भाष्य करणार नाही. इकडे काँग्रेसजन कोमात गेल्याची स्थिती आहे. समीर देशमुख यांनी आज भेट झाल्याचे मान्य केले. याच अनुषंगाने हर्षवर्धन देशमुख लढण्यास अजिबात इच्छुक नसल्याची जोरदार चर्चा उसळली आहे. त्यावर हर्षवर्धन देशमुख म्हणाले की मी पवार साहेबांना व्यक्तिगत कारणास्तव उभे राहण्यास तयार नसल्याचे आज स्पष्ट केले. पण आदेश असल्यास लढू असे नमूद केल्याचे ते म्हणाले.

Story img Loader