नागपूर : तेलंगणाचे मुख्यमंत्री व भारत राष्ट्र समितीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव नुकतेच नागपुरात येऊन गेले. ‘अबकी बार किसान सरकार’ असा नारा त्यांच्या पक्षाचा आहे. तेलंगणात शेतकऱ्यांसाठी राबलेल्या योजनांची माहिती देताना राव यांनी शेतकऱ्यांशी संबंधित असलेले सर्वात महत्त्वाचे तलाठी हे पद संपुष्टात आणल्याचे सांगितले. यामुळे शेतकऱ्यांच्या फायदाच झाला व महाराष्ट्रात सत्ता आल्यास हे मॉडेल राबवू, असे संकेतही दिले. दुसरीकडे तलाठ्यांकडून शेतकऱ्यांचा छळ सुरू असूनही शासनाने हजारो तलाठ्यांची पदे भरण्याची तयारी सुरू केली आहे
शेतकऱ्यांच्या शेतीशी संबंधित नोंदी ठेवण्यासाठी इंग्रज काळापासून जिल्हा प्रशासनात तलाठी पद आहे. मात्र साधा सातबारा हवा असेल तर तलाठ्याला पैसे द्यावे लागते. हीच स्थिती इतर राज्यांतही. पण राव यांनी तेलंगणात हे पद संपुष्टात आणून शेतकऱ्यांची सर्व कामे ऑनलाईन केली. मात्र महाराष्ट्रात तलाठी पद संपुष्टात आणण्याऐवजी नव्याने पद भरती केली जात आहे.
हेही वाचा – अंधश्रद्धा निर्मूलन कार्यात वर्धा जिल्हा विदर्भात अव्वल, चार पुरस्कार पटकावले
तलाठी संवर्गातील ४ हजार ४०३ रिक्त पदे भरण्यासाठी शासनाने मान्यता दिली. अपर जमाबंदी यांची राज्यस्तरीय नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती. राज्यामध्ये ५१८ व्याने निर्माण केलेल्या एकूण ३ हजार ११० तलाठी साझे व ५ मंडळ अधिकारी कार्यालयांसाठी एकूण ३ हजार ६२८ पदे निर्माण करण्यात येणार आहे.