नागपूर: महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासात सर्वात मोठा वाटा एसटीचा आहे. त्यामुळे हे विसरून अमृत महोत्सवी ज्येष्ठ नागरिक सवलतीचे तिकीट जास्तबाबत बदनामीची चर्चा करण्यापेक्षा शासनाने प्रवासी कराच्या रूपाने केलेल्या वसुलीवर चर्चा नाही हे दुर्दैवी असून, शासनाने प्रवासी कराच्या रूपाने एसटीला दरवर्षी करोडो रुपयांचा चुना लावला असून त्यावरही चर्चा झाली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.

सन १९८७- ८८ मध्ये एसटी महामंडळ नफ्यात आले. त्यामुळे एसटी महामंडळाला आयकर भरावा लागेल व ते पैसे केंद्र सरकारकडे जातील म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत शंकरराव चव्हाण यांच्यासारख्या अत्यंत अभ्यासू मुख्यमंत्र्यांनी आयकरच्या रूपाने जाणारी रक्कम केंद्र शासनाला जाऊ नये व ती महाराष्ट्र शासनाच्या कामी यायला हवी म्हणून एसटीला प्रवासी उत्पन्नावर १७.५ टक्के इतका प्रवासीकर लावण्याचा निर्णय घेतला. हा कर लावताना जोपर्यंत एसटी महामंडळ फायद्यात आहे, तोपर्यंतच कर वसूल करण्यात येईल, असेही सांगण्यात आले. पण ही कर आकारणी अद्यापही सुरू असून या वर्षी ७८० कोटी रुपये इतकी रक्कम वसूल करण्यात आली आहे. ती लूट पहिल्यांदा थांबविण्यावर चर्चा झाली पाहिजे. एसटी महामंडळ हा शासनाचा अंगीकृत उपक्रम असून एसटीच्या कुठल्याही कर्मचाऱ्याने किंवा अधिकाऱ्याने अमृत महोत्सवी ज्येष्ठ नागरिक सवलत रक्कम स्वतःला वापरलेली नाही. त्यामुळे विनाकारण सुरू असलेली अमृत महोत्सवी ज्येष्ठ नागरिक सवलतीच्या रक्कमेच्या अतिरिक्त वसुलीची चर्चा बंद करण्यात आली पाहिजे असेही बरगे यांनी प्रसिद्धीपत्रकातून म्हटले आहे.

State Government approved one time transfer for Community Health Officers under National Health Mission
आता समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्याही बदल्या होणार
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Amrit Jyeshtha Nagarik yojna and Mahila Samman Yojana led to increased ST Pune Division Revenue
एसटी भरधाव ! महिला सन्मान याेजनेतून किती केली कमाई ?
public sector banks npa marathi news
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे ‘एनपीए’ ३.१६ लाख कोटींवर
ed to hand over assets worth 125 crores of mehul choksi to banks
पीएनबी गैरव्यवहार प्रकरणः मेहूल चोक्सीविरोधात ईडीची मोठी कारवाई, १२५ कोटींच्या मालमत्ता फसवणूक झालेल्या बँकांना सुपूर्त करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात
3 percent errors possible in ladki bahin yojana application scrutiny
लाडकी बहीण योजनेच्या अर्ज छाननीत तीन टक्के त्रुटींचा संभव;  नाशिक विभागातील स्थिती
Dombivli tax arrears people, Dombivli property seal,
डोंबिवलीत मालमत्ता कर थकबाकीदारांच्या गाळ्यांना टाळे
15 crores governor post marathi news
१५ कोटी द्या, राज्यपाल करतो…तामिळनाडूतील एकाची कोट्यवधी रुपयांना फसवणूक

हेही वाचा – फडणवीसांच्या विरोधात अनिल देशमुख रिंगणात? विद्यामान गृहमंत्री विरुद्ध माजी गृहमंत्री लढतीची शक्यता

लक्ष विचलित करण्यासाठी चर्चा

दीर्घकालीन संपानंतर एसटीला खर्चाला कमी पडणारी रक्कम देण्याचे शासनाने मान्य केले होते. त्यानंतर कधीच खर्चाला कमी पडणारी रक्कम दिली गेली नाही. फक्त सवलत मूल्य प्रतिपूर्ती रक्कम देण्यात येत आहे. त्यातूनच प्रवासी कराची रक्कम वसुली सुरू आहे. यावर चर्चा झाली पाहिजे. पण ती केली जात नाही. अमृत महोत्सवी ज्येष्ठ नागरिक सवलतीच्या रक्कमेची वायफळ व अनावश्यक चर्चा असून मुख्य विषयाला बगल देण्यासाठी अशी चर्चा सुरू आहे, असेही बरगे म्हणाले.

हेही वाचा – “गत पाच वर्षांत या लोकांनी महाराष्ट्र नासवला,” राज ठाकरे असे का म्हणाले?

पगार वाढीची चर्चा करा

वर्ष १९९२ पर्यंत महामंडळातील कर्मचाऱ्यांचे पगार हे शासकीय कर्मचाऱ्यांपेक्षा जास्त होते. आता इतर सार्वजनिक उपक्रम व शासकीय कर्मचारी यांच्या तुलनेत एसटी कर्मचाऱ्यांना खूप कमी वेतन मिळत आहे. त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे यावर चर्चा का होत नाही? असा सवालही बरगे यांनी उपस्थित केला.

Story img Loader